भोकरदन तालुका

दावतपूर येथे उज्वला योजने अंतर्गत ३४ गॅस वाटप

  मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन तालुक्यातील दावतपूर येथे उज्वला योजने अंतर्गत ३४ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले.

ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी चुल आणि लाकडी सरपण मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होण्याबरोबरच महिलांमध्ये आजार वाढीस लागले असून ते रोखण्यासाठी उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस कनेक्शन देण्याचे काम केले जात असून. त्यामुळे महिलांचे आयुष्यमान उंचावण्याचे काम खऱ्या अर्थाने होत असल्याचे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारने प्रत्येक घरात महिलांच्या स्वयपाकासाठी गॅस देण्याची ध्येय ठेवले असून धूर मुक्त गाव करण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला आहे. खेड्या गावातील महिला भगिनी रोजचे अन्न शिजवणे, चहा, पाणी तापवणे आदी कामे चुलीवरच करत असतात. त्यासाठी होत असलेल्या लाकूडतोडीमुळे वृक्षतोड होत असून पर्यावरणासाठी ते घातक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.आ.संतोष दानवे यांच्या सहकार्यातुन ३४ गॅस कनेक्शन चे वाटप केल्याबद्दल गावकर्यांनी आजुबाई इंण्डेन गॅस आन्वा व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
या वेळी सरपंच लंकाताई खंडु घायवट,उपसरपंच श्रीमंता घायवट, ग्रामपंचायत सदस्य , ज्योतीबाई सुभाष घायवट, कल्पना किशोर कांबळे,द्वारकाबाई गणेश घायवट, निर्मला कैलास घायवट व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!