भोकरदन तालुका

विजेचा शाॅक लागुन पेरजापुर येथिल युवकाचा मृत्यू

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन तालुक्यातील पेरजापुर येथील भागवत नामदेव जाधव(22वर्ष) या युवकांचा काल सकाळी 7वाजेच्या सुमारास विजेचा शाॅक लागुन दुर्दवी मुत्यु झाला असुन काल सकाळी तो घरातील लाईनीचा काहीतरी प्राब्लेम झाला असता लाईन सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असतांना अचानक विजेचा जोरदार शाॅक लागुन तो खाली कोसळला त्यांच्या आईने आरडाओरड केली असता गावातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली मेन लाईन बंद करण्यात आली मात्र शाॅक एवढा जबरदस्त होता की भागवतचा जागीच मुर्त्यु झाला.

या घटनेने त्याच कूटुंब गाव स्थब्द झाले असून गावात सकाळी एकही चुल पेटली नाही
भागवत हा एक कर्ता तरुण होता आणि कुटुंबाचा आधार होता तो ट्रक्टर ड्रायवींग व इतर शेती कामे मंजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता
भागवत एक सभ्य शांत आणि सुस्वभावाचे युवक म्हणुन गावासह पंचकोर्षीत सुपरीचत होता.
भागवतला एक छोटा भाऊ आणि एक बहीण असुन आई वडील असा परीवार आहे,भागवत ला एकच एकर जमीन असुन त्यात कष्ट करून भागवत कमवत होता मात्र त्याच्या जाण्याने कुटुंबावर खुप मोठं संकट आलं आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!