रासप स्थानिक स्वराज्य निवडणूक स्वबळावर लढणार-माजी मंत्री बाळासाहेब दोडतले
येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता कामाला लागा स्थानिक पदाधिकाऱ्यांना केले आवाहन
दीपक हिवाळे/ परतूर न्यूज नेटवर्क
येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले यांनी शहरातील विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली
यावेळी मराठवाडा प्रभारी नितीन धायगुडे,माऊली सरस,जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी
तरवटे, नामदेव गोरे,दत्ता कोल्हे,गणेश मिसाळ,कृष्णा गायकवाड,विलास रोकडे,भगवान पाटोळे,नंदू गांजे, दत्ता काळे,कैलाश देशमाने,अबूद चाऊस,सिद्धार्थ पानवाले,रंगनाथ तांगडे,संजय जाधव,यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
येणाऱ्या निवडणुकी संदर्भात आम्ही व आमचा पक्ष विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करून मार्गस्थ करणार आहोत . त्यामुळे अन्य कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही.सर्व जागांवर पक्ष उमेदवार देणार आहे, अशी माहिती पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी दिली. स्थानिक स्वराज्य निवडणूक संदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ही आयोजित करण्यात आली होती असे ही त्यांनी यावेळी सांगितले
त्यानंतर श्री दोडतले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यासोबतच ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने ही महाराष्ट्र भर जनजागृती ही पक्षाच्या माध्यमातून करीत आहोत आणि हा लढा ओबीसी समाजाला न्याय मिळवुन देण्यासाठी असल्याचे प्रतिपादन यावेळी श्री दोडतले यांनी केले.
यासोबतच जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तत्काळ मदत शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी पक्षाच्या वतीने पाठपुरावा करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत दिली नाही तर येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी तरवटे यांनी यावेळी दिला आहे.