भोकरदन तहसीलदारपदी सारिका कदम रूजू
मधुकर सहाणे
भोकरदन मागील दीड महिन्यांपासून असलेल्या भोकरदन रिक्त तहसीलदारपदी नुकताच औरंगाबाद येथून पदोन्नती मिळालेल्या सारिका कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे . भोकरदन तालुक्याला महिला तहसीलदार मिळाल्या असल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे . तत्कालीन तहसीलदार संतोष गोरड यांची जालना येथे प्रशासकीय बदली झाल्याने मागील दोन महिन्यांपासून येथील तहसीलदारपद रिक्त होते . तहसीलदारपदाचा पदभार नायब
तहसीलदार धर्माधिकारी यांच्याकडे देण्यात आला होता . मात्र , त्यांचीही अंबड येथे बदली झाली व हे पद रिक्त होते . त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी नायब तहसीलदार दांडगे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता . प्रभारी पदामुळे तहसीलमध्ये कामानिमित्त गेलेल्या शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता . वरिष्ठांचा अंकुश नसल्याने काही कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू होती ; आता तहसीलदार मिळाल्याने ही मनमानी थांबणार आहे . शिवाय कदम यांनी यापूर्वी येथे केलेल्या कामांचा त्यांना लाभ होणार आहे