जालना जिल्हा

धक्कादायक ! जालन्यात भगरीच्या भातातून सहा जणांना येथे झाली विषबाधा

जालना : नवरात्रच्या उपवासाठी तयार केलेल्या भगरीच्या भातातून सहा जणांना विषबाधा झाल्याची घटना अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात घडली आहे. सहा नागरिकांना भातातून विषबाधा झाल्याने त्यांना उपचरासाठी वडीगोद्री येथील एका रुग्णालयात उपचरासाठी नेण्यात आल्याची माहिती समोर आली.

images (60)
images (60)

नवरात्रोत्सवानिमित्त अनेकजण भक्तीभावाने नऊ दिवस उपवास करतात . त्यात आज पहिली माळ असून अंतरवाली सराटी येथील तारक कुटुंबातील सदस्यांनीही उपवास ठेवला होता . उपवास असल्याने सकाळी 11 वाजता भगर खाऊन शेतात काम करायला गेले . दरम्यान आज दुपारी 2.30 च्या सुमारास या सर्वांना शेतात मळमळ उल्टी , थरकाप तसेच थंडी वाजून त्रास होऊ लागला . त्यांची बिघडलेली प्रकृती पाहून शेजारीच असलेल्या योगेश तारख यांनी ज्ञानेश्वरी व कांताबाई तारख यांनी सोडता चौघांना बैलगाडीतून संभाजीनगर – बीड राष्ट्रीय महामार्गपर्यंत आणून नंतर वाहनांनी त्यांना वडीगोद्री येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले . सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत . six-citizens-food-poision-navratri-2021-jalna-aurangabad-news-

जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे . उपवासासाठी भगर खाल्ल्याने एकाच कुंटबातील सात वर्षाच्या मुलीसह सहा जणांना विषबाधा झाल्याची घटना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे घडली आहे . या घटनेने परिसरात खळबळ माजली असून सर्वांवर वडीगोद्री येथे उपचार सुरू आहेत .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!