भोकरदन तालुका

भोकरदन तालुक्यात अवैध रित्या विकल्या जाणारे दहा लाखाचे बायोडिसेल जप्त..

भोकरदन महसुल पथक व पोलीसांची मोठी कारवाई

images (60)
images (60)

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन शहरापासून 3 की मी अंतरावर भोकरदन- सिल्लोड रोडवरील इब्राहिमपूर शिवारात अवैधरित्या साठवून बायोडिझेल ची विक्री करीत असलेल्या ठिकाणावर गुरुवारी दि. 7 रोजी मिळालेल्या गुप्त माहिती वरून भोकरदन येथील महसुल व पोलीसांच्या संयुक्त पथकाने छापा मारून कारवाई करीत सहा सिंटेक्स टाक्या व एक टँकर मध्ये साठवून ठेवलेले साडे दहा लाखाचे अवैध बायोडिझेल जप्त करून आरोपी अब्दुल रहीम याचे विरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती छापा पथक प्रमुख व पुरवठा विभागाचे नायबतहसीलदार बालाजी पपुलवाड यांनी दिली.

गेल्या दोन महिन्यांपासून भोकरदन शहर व परिसरात खुलेआम हायवेवर अवैधरित्या बायोडिझेल विक्री सुरू होती.या बाबत नुकतेच पेट्रोल पम्प चालक संघटनेने प्रशासनाला संबंधित प्रकार निदर्शनास आणून दीला होता.त्या अनूशंगाने नुकतेच जालना व भोकरदन येथे महसूल पोलीस प्रशासनाने अवैध डिझेल माफिया विरुद्ध कारवाई करून साठा व साहित्य जप्त केले.या कारवाई मुळे अवैध बायोडिझेल विक्री करणारे माफिया चांगलेच हादरले आहे.


भोकरदन येथे कारवाई केलेल्या संयुक्त पथकात प्रमुख नायब तहसीलदार बालाजी पप्पूलवाड,
तलाठी संदीप लाड , तलाठी कल्याण माने
चालक गणेश वाघमारे व पोलीस कर्मचारी समाधान जगताप कॉन्स्टेबल, विकास जाधव शिवाजी तेलंगरे कोतवाल सहाभागी झाले होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!