मंठा तालुका

तळणी हायस्कूलचा कारभार प्रभारी : १५ वर्षापासून मुख्याध्यापक पद रिक्तच ; शिपाई मिळेना !

विद्यार्थी वेळेपुर्वी तर शिक्षक सोईनूसार शाळेत

images (60)
images (60)

ए. राऊत /तळणी

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये विद्यार्थी वेळेपूर्वी तर शिक्षक वेळेनंतर आपआपल्या सोईनुसार शाळेत येत असल्याचे दिसून आले. शुक्रवारी सकाळी १० वा. दोन्ही शाळेला भेटीदरम्यान हा प्रकार समोर आला.

तळणी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत १ ते ४ पर्यत २३७ विद्यार्थी असून मुख्याध्यापकांसह ७ शिक्षक कार्यरत आहेत. तर जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये १ ते ८ पर्यत ३१३ विद्यार्थी असून ९ व १० विद्यार्थीची संख्या जुळवणे बाकी आहे. तर मुख्याध्यापक पद रिक्त असून १४ शिक्षक कार्यरत आहेत. यामध्ये शिक्षक जे बी वायाळ व एम वाय बेग हे प्रतिनियुक्तीवर आहेत. शाळेत शिक्षकांनी १० वा. हजर राहणे बंधनकारक असून अदयापनाची वेळ १० : ३० ते १:३० अशी आहे. शाळेत विद्यार्थी १० वाजता हजर होते तर तीन शिक्षक वगळता इतर शिक्षक सव्वा दहा , कुणी साडेदहा तर काही आकरा पर्यत आपआपल्या सोईनुसार येत असल्याचे दिसून आले. काहीनीतर दोन दिवसांच्या एकावेळी हजेरीपटावर स्वाक्ष-या केल्याचे दिसून आले.

१५ वर्षापासून मुख्याध्यापक पद रिक्त …

जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक पद १५ वर्षापासून रिक्त असून प्रभारी मुख्याध्यापक कारभार सांभाळत आहे. तर दोन शिपाई पदे रिक्त आहेत. एम वाय बेग व जे बी वायाळ हे प्रतिनियुक्तीवर आहेत.

मुख्याध्यापक बॅकेत …

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक जे डी इंगळे हे कामानिमित्त बॅकेत तर शिक्षक एफ डी गारोळे झॅरास काढण्यासाठी बस स्टँडवर गेल्याचे सांगितले. तर शिक्षक पी जे वराडे व ए डी आकाळ शाळेत हजर आढळून आले.

दोन दिवसांच्या स्वाक्ष-या एकाचवेळी …

दोन्ही शाळेतील काही शिक्षकांनी उशीराने येऊन एकाचवेळी दोन दिवसाच्या हजेरी स्वाक्ष-या केल्याचे दिसून आले.

याबाबत जिल्हा परिषद हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक आर एल चव्हाण यांना विचारले असता, सर्व शिक्षक वेळेवर येतील याची काळजी घेईल , असेही चव्हाण म्हणाले.

याबाबत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जे डी इंगळे यांना विचारले असता, बँकेच्या कामानिमित्त बाहेर असल्याचे इंगळे म्हणाले.

मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे कार्यालय १० : १५ वाजेपर्यत बंद होते. तर केंद्रीय प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक ११ वाजेपर्यंत आलेच नव्हते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!