कुंभार पिंपळगाव येथील आठवडी बाजरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू;पोलिसांचे दुर्लक्ष
कुलदीप पवार/कुंभार पिंपळगाव
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव हे बाजारपेठेचे मोठे मुख्य गाव आहे.आठवड्याच्या दर बुधवारी आठवडी बाजार भरत असतो.या आठवडी बाजारात मागील काही दिवसांपासुन चोरट्यांचा धुमाकूळ वाढला असून चोरींच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.याकडे कुंभार पिंपळगाव येथील पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. आठवडी बाजारासाठी तीस ते चाळीस गावातील लोक येथे बाजार करण्यासाठी नेहमी येत असतात. त्यामुळे येथील बाजारात नागरीकांची नेहमीच वर्दळ असते. याचा फायदा भुरट्या चोरटे घेत असून दर बुधवारी मोबाईल चोरीला जात आहेत. या अगोदर सुध्दा अनेक मोबाईल चोरीला गेले आहेत. घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील आठवडी बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ वाढला असून, याकडे कुंभार पिंपळगाव पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.कुंभार पिंपळगाव येथील आठवडी बाजारात नागरीकांची नेहमीच वर्दळ असते. याचा फायदा चोरटे घेत असून दर बुधवारी मोबाईल चोरीला जात आहेत. या अगोदर सुध्दा अनेक मोबाईल चोरीच्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत. परंतु या चोरट्यांचा शोध लाग
णार तरी कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान चोरीच्या घटनेने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देऊन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.