भोकरदन तालुका

महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद राजुर कडकडीत बंद

श्रीक्षेञ राजुर : प्रतिनिधी

images (60)
images (60)

श्रीक्षेत्र राजुर आज महा विकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला राजूर येथे उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. व्यापारी बांधवांनी आपली दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवून यामध्ये सहभाग नोंदवला यावेळी महा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी चौकांमध्ये सभा घेऊन लखीमपूर येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून सदरील मंत्र्याच्या मुलाला मोठी सजा करावी अशी मागणी करून त्यामध्ये मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून घोषणाबाजी केली.

सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय, केंद्र सरकार हाय हाय अशा घोषणांनी राजूर परिसर दणाणून सोडला यावेळी जि .प. सदस्य कैलास पुंगळे, राष्ट्रवादीचे नेते अरविंद थोटे, मंगेश जाधव ,दत्ता पाटील पुंगळे, भगवान ठोंबरे, आकाश पुंगळे कारभारी टेपले, अमोल पवार रमेश रेंनगडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!