भोकरदन तालुका

अधिकाऱ्याच्या अर्वाच्य भाषेविरोधात भोकरदन तलाठी संघाचे तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)


अर्वाच्य भाषा वापरल्याप्रकरणी अधिकार्याविरोधात भोकरदन तलाठी संघातर्फे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अधिकारी रामदास जगताप यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी तलाठी संघाचे अध्यक्ष बी एस सोनवने कार्याध्यक्ष कल्याण माने सचिव नंदकिशोर कटारे , यांच्यासह सर्व तलाठी उपस्थित होते. भोकरदन तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की ई महाभूमी प्रकल्प समन्वयक रामदास जगताप यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाच्या पदाधिकारी यांच्या विरोधात एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये असंसदीय भाषेचा वापर करून अपमानित केले रामदास जगताप यांची बदली करण्यासाठी संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र तलाठी संघाने आंदोलन छेडले आहे .

त्याचा भाग म्हणून 7 व 8 ऑक्टोंबर रोजी निषेध नोंदवण्यात आला 11 ऑक्टोंबर रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले 12 ऑक्टोंबर रोजी ऑनलाइन कामावर बहिष्कार टाकण्याचा तसेच यानंतर ही बदली न झाल्यास 13 ऑक्टोंबर पासून संपूर्ण कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला दरम्यानच्या काळात नैसर्गिक आपत्ती व निवडणूक कामकाज चालू राहील असे भोकरदन तलाठी महासंघाचे सचिव नंदकिशोर कटारे यांच्या वतीने कळविण्यात आले.

यावेळी सादर केलेल्या निवेदनावर भोकरदन तलाठी संघाचे अध्यक्ष बी एस सोनवणे सचिव नंदकिशोर कटारे कार्याध्यक्ष कल्याण माने मंडळ अधिकारी पी जी काळे, व्ही. ए राजपूत,कृष्णा एडके, आपासहेब कोठुळे, थारेवल, तलाठी मनोज जैन, अण्णासाहेब कड,एस एम कुलकर्णी,संदीप लाड,राम कांबळे,पूजा पडूल,श्वेता सुर्यवंशी,विजयालक्ष्मी बाळापूरे, गणेश तांगडे, राजाराम गायके, हरिश्चंद्र इंगळे, विठ्ठल गाडेकर, अंकुश सोनवणे, अंकुश बावस्कर, अरुण गावंडे, संदीप जूडे, गजानन लहाने, सुधाकर पहूरे, शिवाजी काळे, आत्माराम जायभये व इतर तलाठी सदस्य हजर होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!