पिंपळगाव रेणुकाई येथे पंजाब डख यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
पिंपळगाव( रेणुकाई )येथे प्रसिद्ध हवामान संशोधक पंजाब डख यांचे शेतकऱ्यांना सल्ला आणि मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न,मार्गदर्शन ऐकण्यासाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी, डख यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.
(रवींद्रकुमार लोखंडे /भोकरदन )
-भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव (रेणुकाई )येथे सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध हवामान संशोधक पंजाब डख यांचे परिसरातील शेतकऱ्यांसाठी जाहीर सल्ला व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन पिंपळगाव (रेणुकाई )ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी डख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन करतांना शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच पेरणी करावी, पेरणी करण्याची पद्धत, पिकांना पाणी देण्याची पद्धत, बियाणे कोणते वापरायचे आदी विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यानो चिंता करू नका पाऊस, वादळं आदी नैसर्गिक आपत्तीपासून मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही असा विश्वास डख यांनी शेतकऱ्यांना दिला. यावेळी परिसरातील दोन हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी ह. भ. प. विष्णू महाराज सास्ते यांनी देखील मार्गदर्शन केले.