भोकरदन तालुका

जळगाव सपकाळ येथील ७७ हेक्टर गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटणार!


औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिले आदेश
जळगाव सपकाळ :
भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे दि.१३ अाॅक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता ग्रामसभा घेण्यात आली होती ग्रामसेवक महेंद्र साबळे यांनी गावात ग्रामपंचायतीच्या विविध योजनेची माहिती दिली 15 वा वित्त आयोगाच्या खर्चासाठी चा गावातील सर्वे पूर्ण झालेला आहे तसेच एक दिवस मायबापा साठी या अतर्गत आशा वर्कर यांनी सर्वे केला आहे तसेच जर कोणी सर्वे तून राहिले असेल तर त्यांनीही स्वतः ग्रामपंचायत कार्यालय अथवा आशा यांना कागदपत्र द्यावे ही सर्व विनामूल्य आहे अशी माहिती त्यांनी दिली असे सांगून त्यांनी गायरान जमिनीचा मुद्द्याला हात घातला .
येथील गायरान जमिनीवर अनेकांनी अतिक्रमण केले व त्यावर ताबा केला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अतिक्रमण काढणे बाबत बाबुराव रामभाऊ सपकाळ यांनी २०१७ ला याचिका दाखल केली होती त्या अनुषंगाने याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सदरील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हे तात्काळ अतिक्रमण धारकांनी काढण्यात यावे असा आदेश देण्यात आला आहे तसेच संबंधित गायरान अतिक्रमण ग्रामपंचायत व तहसीलदार यांना सुद्धा देण्यात आला आहे जळगाव सपकाळ येथे गट नंबर ११३८ ,५५६, ५६४,६२४ शासकीय गायरान जमिनीवर गावातील अनेक ग्रामस्थांनी अवैधरित्या अतिक्रमण केले असून ७७ हेक्टर गायरान जमीन पूर्णपणे अतिक्रमणित झाली आहे

images (60)
images (60)


जळगाव सपकाळ तालुका भोकरदन जिल्हा जालना या गावातील गायरान जमिनीवर अवैधरित्या अतिक्रमण झालेले असून त्या विरोधात बाबुराव रामभाऊ सपकाळ यांनी २०१७ साली जनहित याचिका दाखल केली होती .त्यात अनेक अतिक्रमणधारकांनी गायरान जमीन अतिक्रमण केली आहे. सदर जमिनीची दहा वर्षांपूर्वी रितसर शासकीय मोजणी झाली आहे. जनहित याचिका ग्राह्य धरून जळगाव सपकाळ येथील असलेले शासकीय जमिनीवरील अतिक्रमण तत्काळ हटवावे असे आदेश उपविभागीय कार्यालय यांना देण्यात आले होते तसेच तीन महिन्याच्या आत अतिक्रमण काढून त्याचा खुलासाही देण्यात यावा असे आदेशात म्हटले आहे. त्यावेळेस तत्कालीन सरपंच शामकांत सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली होती ग्रामसभेत सविस्तर चर्चा करून उपविभागीय अधिकारी यांना कळविण्यात आले होते परंतु या वेळेस उपविभागीय अधिकारी तहसीलदार गट शिक्षणाधिकारी यांनी अतिक्रमण हटवण्याचा चेंडू ग्रामपंचायतीच्या कोर्टात लोटला असून ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटवावे ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन अतिक्रमण हटवण्याबाबत एक तारीख निश्चित करावी व पोलिस संरक्षणाखाली सर्व अतिक्रमण हटवावे त्या अनुषंगाने आज येथील झालेल्या ग्रामसभेत गांवकरी यांनी अतिक्रमण हटवण्याचा ठराव मंजूर केला असून एक डिसेंबर २०२१ रोजी अतिक्रमण हटवावे असे ग्रामसभेत ठरले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!