बदनापूर तालुका

प्रा आ केंद्र सोमठाणा वैद्यकिय अधिका-याचा हुकूशाहीचा झाला कहर, कर्मचा-याच्या वेतनातून कपात केलेली रक्कम अधिका-याच्याच खात्यात जमा

images (60)
images (60)

बबनराव वाघ/उपसंपादक

बदनापुर तालुक्यातील सोमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ . जे . जी . कुंडकर यांच्या बेजबाबदार कारभारामुळे केंद्राअंतर्गत कार्यरत सदर असलेले कर्मचारी वेतनापासून वंचित राहिले आहे . कुंडकर यांच्याकडे असलेला पदभार तातडीने काढून आरोग्य कर्मचाऱ्यांचे मासीक वेतन तातडीने अदा करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य जि . प . आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे .

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , प्राथमिक आरोग्य केंद्र , सोमठाणा ता . बदनापुर येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हीड १ ९ काळात अत्यंत जोखीम स्वीकारून जिवाची पर्वा न करता जबाबदारीने कर्तव्य पार पाडलेले आहे . तसेच नियमीत आरोग्य विषयक कामे देखील तत्परतेने करीत आहे . प्राथमिक आरोग्य केंद्र , सोमठाणा येथील कनिष्ठ सहाय्यक हे पद रिक्त असून त्यामुळे कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबरच्या वेतनाची देयके वरिष्ठ कार्यालयास सादर झालेले नाही . तसेच माहे एप्रिल २०२१ पासून ते आजपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या रकमा वैद्यकिय अधिकारी यांच्या खात्यावर जमा असुन वैद्यकिय अधिकारी डॉ . जे . जी . कुंडकर यांनी सदर रकमेचे धनादेश अदयापही संबंधीत संस्थेकडे जमा केले नाहीत . सदर रकमांच्या व्याजाचा भुदंड कर्मचान्यांना सहन करावा लागत असून याबाबत वैद्यकिय अधिकारी डॉ . कुंडकर यांना वारंवार विचारणा केली परंतु संबंधीत वैद्यकिय अधिकारी यांनी याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही . उलट कर्मचाऱ्यांना मानसीक त्रास देत असल्याचे सर्व कर्मचाऱ्यांनी सांगीतले . कर्मचाऱ्यांची कामकाज करण्याची मानसीकता राहिलेली नाही . तरी संबधीत अधिकारी यांनी डॉ . जे . जी . कुंडकर यांचा अहरण व वितरण अधिकारी पदाचा पदभार तात्काळ काढून सदर पदभार इतर अधिकाऱ्याकडे देण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे .

मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . विवेक खतगांवकर यांना
व प्रतिलिपी : माहितीस्वत व योग्य त्या कार्यवाहीस्तव १. मा . ना राजेशभैय्या टोपे , आरोग्य मंत्री तथा पालक मंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई २. मा . उत्तमराव वानखेडे , अध्यक्ष , जिल्हा परिषद जालना ३. मा . जिल्हाधिकारी , जिल्हाधिकारी कार्यालय , जालना, ४. मा.आ. नारायणराव कुचे , बदनापुर विधानसभा मतदार संघ , बदनापुर ,५. मा . उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना, ६ मा पुजाताई सपाटे , सभापती , आरोग्य व शिक्षण समिती जि . प . जालना, ७. मा . गटविकास अधिकारी पंचायत समिती बदनापूर , ८. मा . तालुका आरोग्य अधिकारी , तालुका बदनापूर, ९ . मा . कैलासराव चव्हाण , जि . प . सदस्य तथा अध्यक्ष रुग्ण कल्याण समिती प्रा . आ . केंद्र सोमठाणा ,१०. मा . स्वातीताई संतोष नागवे , सरपंच ग्रा . पं . कार्यालय सोमठाणा ता . बदनापूर जि . जालना ,११. मा . अध्यक्ष / सचिव म . रा . जि . प . आ . सेवा कर्मचारी संघटना जिल्हा जालना ,१२. मा . अध्यक्ष / सचिव म . रा . जि . प . आ . सेवा कर्मचारी संघटना ता . बदनापूर यांना निवेदन देण्यात आले.
सदर शिष्टमंडळात संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर पाटील लहाणे , सरचिटणीस दिलीप अहिरे , कार्याध्यक्ष राजु रसाळ , जिल्हा परिषद बहुविध आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन रमेश राठोड यांच्यासह, डी.डी. दाभाडकर, एस . एस . देशपांडे ,जी.पी. देशमुख ,पी . डी . चौधरी, ए . बी . शिर्के ,एस . एम . बोडले, के . सी . डोंगरे, एस . एल . घुगे ,एस . एम . गायकवाड ,एस . एन . भाग्यवंत, के . व्हि . मोरे ,सि . पी . भालेराव, ए . ए . शेटे ,जि . एल . नागरे ,आर . एस . साबळे ,जी एस जाधव ई. कर्मचारी यांचा समावेश होता .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!