शाहरूख खान च्या मुलामुळे मुख्यमंत्री अडचणीत …?
मुंबई – आर्यन खान (aryan khan) प्रकरण किंग खान शाहरुखसाठी (king khan shahrukh khan) मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या घटनेनं वेगळं वळण घेतलं आहे. आतापर्यत सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय स्तरांतून या घटनेला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. त्यात आता काही राजकीय नेत्यांनी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात एक नाव जम्मु काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचे आहे. त्यांनी शाहरुखला पाठींबा देत त्याच्या बाजूनं एक वक्तव्य केलं आहे. मात्र त्यांनी केलेल्या या वक्तव्याची मोठी किंमतही त्यांना चुकवावी लागल्याचे दिसून आले आहे. त्याचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले आहे.
एनसीबीनं आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून उद्या या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. यासगळ्या परिस्थितीत मेहबुबा मुफ्ती यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी सोशल मीडियावर एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आर्यन खानवर करण्यात आलेल्या कारवाईमागे त्याचे आडनाव हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या या प्रकारच्या वक्तव्यामुळे त्या अडचणीत सापडल्या आहेत. याविषयी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मेहबुबा मुफ्ती यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी तक्रारदार वकीलानं केली आहे. जाणीवपूर्वक एका विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केले जात आहे. एका राजकीय पक्षाची ही मतांसाठीची खेळी आहे. असेही त्यांनी म्हटलं आहे.