अट्टल घरफोडया करणाऱ्या आरोपीस जळगाव येथुन घेतले ताब्यात…
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन शहरात शनिवारी रात्री अज्ञात चोरट्याने मुख्य रोड वरील इक्बाल यांचे दुकानाचे पत्रे उचकटून दुकानातील सुमारे तीस हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेला होता सदर बाबत पोलीस ठाणे भोकरदन येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी भोकरदन श्री इंदलसिंग बहुरे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली भोकरदन पोस्टेचे प्रभारी अधिकारी सपोनि आर बी जोगदंड व त्यांचे पथकाने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळावर उपलब्ध असलेल्या पुराव्यांच्या आधारे झालेल्या चोरीचा तांत्रिक तपास केला असता सदर ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीच्या हरकती दिसून आल्या होत्या .
त्यावरून भोकरदन पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन आरोपी नामे प्रवीण उर्फ पप्पू रणछोड पाटील राहणार बीडगाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव यास दिनांक 20 आॅक्टोंबर रोजी जळगाव येथून ताब्यात घेतले व त्यास पोलीस ठाणे भोकरदन येथे हजर करण्यात आले त्याचेकडे विचारपूस केली असता त्याने दिनांक 16 ऑक्टोबर 21 रोजी भोकरदन शहरातील मुख्य रस्त्यावरील इक्बाल यांचे दुकान पत्रे उचकटून फोडले असल्याचे व दुकानातील किमती वस्तू चोरी केल्याची कबुली दिली आहे तसेच चोरी केलेला माल जळगाव येथील इसमास विक्री केले बाबत सांगितले आहे सदर आरोपी कडे भोकरदन पोलिसांकडून कसोशीने विचारपूस करून गुन्ह्यातील चोरी झालेला माल हस्तगत करण्यात येत आहे सदर आरोपीस ताब्यात घेणे करिता स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांची मदत घेण्यात आली आहे
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, मा.अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख , उपविभागीय पोलिस अधिकारी इंदल सिंह बहुरे ,यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि आर. बी. जोगदंड ,पोउपनि वाय. आर. पाडळे, पोहेका दत्ता राऊत,पोलीस नाईक गणेश पायघन ,अभिजीत वायकोस, पोलीस शिपाई अनिल गवळी, गणेश निकम यांचे पथकाने केली आहे.