भोकरदन तालुका

नागरिकांमध्ये विधी साक्षरता असणे गरजेचे , एपीआय अभिजित मोरे

कायदेविषयक शिबिर। दिवाणी न्यायालय भोकरदन व वकील संघ यांनी केले जळगाव सपकाळ येथे आयोजन.

images (60)
images (60)


जळगाव सपकाळ,—विद्येविना मती गेली गतीविना मती गेली मती विना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले ज्याप्रमाणे आपण विद्या ग्रहण करून साक्षर होतो त्याचप्रमाणे आपल्यामध्ये विधी साक्षरता असणे देखील तेवढेच गरजेचे आहे असे प्रतिपादन जळगाव सपकाळ येथील दिवाणी न्यायालय भोकरदन वकील संघ भोकरदन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरामध्ये पारध येथील एपीआय अभिजित मोरे यांनी मत मांडले


भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार दिनांक 2 ऑक्टोंबर 2021 महात्मा गांधी जयंती ते 14 नोव्हेंबर 2021 पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती पर्यंत आजादी का अमृत महोत्सव निमित्त सामान्य जनतेला भारतीय कायद्याचे ज्ञान व्हावे याकरिता जनजागृती शिबिराचे जळगाव सपकाळ येथे दिवाणी न्यायालय भोकरदन व वकील संघ भोकरदन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते


कार्यक्रमात पुढे बोलताना मोरे म्हणाले ग्रामीण भागात पोलिसांची भीती असते ती भीती निघावी म्हणून अशा या शिबिराचे आयोजन करण्यात येत असून कोणता गुन्हा दखलपात्र आहे कोणता गुन्हा अदखलपात्र आहे याबाबत ज्ञान असणे आवश्यक आहे पोलिसांना नागरिकांनी घाबरून न जाता त्यांना आपला मित्र समजावा व आपल्यावर होत असलेला अन्याय आमच्यापर्यंत पोचवा अन्यायाला वाचा फोडा अन्याय सहन करू नका परंतु असे करत असताना गावातील लहान-मोठे तंटे असतील ते गावातल्या गावातच मिटवा कोणताही गुन्हा दाखल केल्यानंतर फिर्यादीस वाटते की पोलीस आरोपीला अटक का करीत नाही प्रत्येकाची अपेक्षा असते की पोलिसांनी आरोपीला अटक करावी परंतु प्रत्येक प्रकरणांमध्ये आम्हाला आरोपीस अटक करता येत नाही त्यासाठी नागरिकांना विधी साक्षर होणे आवश्यक आहे.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी माननीय शीतल बजाज दिवाणी न्यायाधीश भोकरदन या होत्या
त्यानंतर भोकरदन वकील संघाचे व्ही बी सपकाळ यांनी हिंदू वारसा कायदा याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले वडिलोपार्जित मिळकत स्वतः कमावलेली मिळकत आणि वडलोपार्जित संपत्तीवर कमावलेली मिळकत असे तीन प्रकार हे हिंदू वारसा कायद्यामध्ये आहेत असे त्यांनी सांगितले कोणत्याही जमिनीचा व्यवहार करत असताना त्या व्यवहारावर जमीन विक्रीचे कारण अवश्य नमुद करावे.
कोणत्याही गुन्हेगारास कायद्याच्या तरतुदीत राहून अटक करावी लागते किंवा त्या जामीन द्यावा लागतो ते सर्व काही पोलीस वकील आपली न्यायव्यवस्था हे सगळे कायद्याला धरूनच कार्य करत असतात त्यामुळे कायद्याबाबत असलेले आपले अज्ञान दूर करून कायद्याचे मूलभूत ज्ञान आत्मसात करावे एखाद्या नागरिकास कल्याणकारी योजना मिळत नसेल त्या योजनेचे लाभार्थी असेल तर कायद्याने कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास न्यायालयामध्ये दाद मागता येते न्यायालय तुम्हाला कल्याणकारी योजना मिळवून देऊ शकतात त्यासाठी कायदेविषयक मूलभूत अज्ञान नागरिकांनी आत्मसात करावे असे प्रतिपादन श्री बीएस जगदाळे सहाय्यक दिवाणी न्यायाधीश भोकरदन यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मध्ये सांगितले. चंद्रकांत झाल्टे यांनी सूत्रसंचालन केले तर जी एस सपकाळ यांनी प्रस्ताविक केले यावेळी बी एस जगदाळे सहाय्यक दिवाणी न्यायाधीश भोकरदन एडवोकेट बी.बी. वाघ अध्यक्ष वकील संघ भोकरदन तळेकर एडवोकेट के बी तळेकर एडवोकेट बी बी सपकाळ एडवोकेट एस एम साबळे एडवोकेट मयुर वडगावकर एडवोकेट रवींद्र साबळे एडवोकेट, जिल्हा परिषद सदस्य सुनिता सपकाळ ग्राम विकास अधिकारी महेंद्र साबळे पप्पु सपकाळ,बन्सी वर्पे,गणपतराव सपकाळ,हेमंत सपकाळ, प्रशांत बुरकुले यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
“मिशन कवच कुंडल रॅलीमध्ये न्यायाधीशांनी घेतला सहभाग गावामध्ये लसीकरणाविषयी जनजागृती रॅली काढण्यात येणार होती व या मिशन कवच कुंडल रॅलीमध्ये भोकरदन दिवाणी न्यायालयाचे न्यायधीश यांना ग्रामस्थांनी सहभागी होण्याची विनंती केली व न्यायाधीशांनी होकार भरला आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!