परतूर तालुका

शिवसेनेच्या मेळाव्याला अधिक संख्येने उपस्थित राहा – मोहन अग्रवाल 

images (60)
images (60)

दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क

आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन रविवारी सकाळी ११ वाजता शहरातील वरद विनायक लोन्स येथे करण्यात आले आहे. राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. या मेळाव्याला जिल्हा संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, परभणीचे खासदार संजय जाधव, बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार तथा पंचायतराज समितीचे अध्यक्ष डॉ.संजय रायमुलकर, माजी आमदार शिवाजीराव चोथे, जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर, ए.जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, बुलडाणा जिल्हा प्रमुख बळीराम मापारी, रामेश्वर नळगे, उपजिल्हा प्रमुख माधवराव कदम, बाबासाहेब तेलगड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तालुक्यातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांनी केले. शनिवारी दुपारी २ वाजता शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख  बाबासाहेब तेलगड, माधवराव कदम,सुदर्शन सोळंके, भगवानराव सुरुंग, विदुर जईद, दत्ता सुरुंग, अहेमद चाऊस यांची प्रमुख उपस्थिती होती.
आगामी पालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातील नेते,पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख अशोकराव आघाव, शहर प्रमुख विदुर जईद, दत्ता सुरुंग, युवासेनेचे अजय कदम, महिला आघाडीच्या कुंतीका भुसारे, युवसेना शहर प्रमुख सोनू भोकरे, राहुल कदम, दलित आघाडीचे मधुकर पाईकराव आदींनी केले आहे.                    परतूर शहराच्या विकासासाठी 3 कोटी रुपये निधी खेचून आनला – मोहन अग्रवाल यावेळी  परतूर शहराच्या विकास कामाबाबत माहिती देतांना  मोहन अग्रवाल यांनी म्हटले की  पक्षाचा प्रमुख नेता व पालिकेत गटनेत्याची भूमिका बजावताना मी परतूर शहराच्या विकासासाठी माजी राज्य मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्याकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली होती  या पैकी तीन कोटी निधी प्राप्त झाला असून, यात दोन कोटी 80 लक्ष रुपया मध्ये 25 कामाना प्रशाषकिय मान्यता मिळाली आहे. त्यात जिजाऊ नगर, प्रलादपूर नगर, शिवाजी नगर मंदिर परिसर, संमित्र कॉलनी, नागवंश नगरात पुलाचे बांधकाम, आदर्श कॉलनी, संत रोहिदास नगर, लढा कॉलनी मोंढा परिसर बालाजी नगर, व्यकटेश नगर, राजे संभाजी नगर, सातोनकर मळा, सरवस्ती कॉलनी इत्यादी ठिकाणी सिमेंट रस्ते व नालीचे बांधकाम करणे , डॉ प्रशांत अँभुर यांच्या दवाखानासमोर महाराजा अग्रसेंन चौकाचे शुशोभीकरन, बालाजी नगर येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम, वखार महामंडळ येथे सामाजिक सभागृहाच बांधकाम इत्यादी 25 कामांना प्रशाष्कीय मान्यता मिळाली असून सदरील कामांची प्रत्येक्ष  सुरवात दीपावली नंतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले तसेच दोन कोटीचे प्रस्तावित कामे मंजुरीच्या अंतिम टप्यात असून त्यात पंचशील नगर येथे सामाजिक सभागृह, कुरेशी गल्लीत कबरस्थान सवरक्षक भिंत बांधकाम, राजपूत गल्लीत रस्ते व नालीचे बांधकाम, बागल गल्लीत सामाजिक सभागृहाचे बांधकाम, भाजी गाव परिसर, जुना मोंढा इत्यादी ठिकाणी ट्रीमिक्स सिमेंट रस्त्याचे बांधकाम इत्यादी कामे प्रसावीत केली असून सदरील निधी दीपावली नंतर प्राप्त होणार आहे, तसेच परतूर शहरात खा संजय जाधव, आ अंबादास दानवे यांच्या विकास निधीतून एक कोटी रुपयांचे विकास कामे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!