शिवसेनेच्या माध्यमातून परतूर शहरातील रस्ते चकचकीत करणार – मोहन अग्रवाल
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
शहरातील व्यंकटेश नगर व बालाजी नगर येथील नागरिकांनी वेळोवेळी नगर पालीका गटनेते मोहन अग्रवाल यांच्याकडे रस्ता तयार करण्या संदर्भात मागणी केली असता अग्रवाल यांनी स्वतः पुढाकार घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाचे संबंधित अधिकारी व संचालक मोपलवार मुंबई यांच्याकडे पाठपुरावा करून संबंधित विभागाकडून या रस्त्याचे काम सुरू केले व पूर्णत्वाकडे नेण्यात यश आले. याकामी मला राज्य रस्ते विकास व नगर विकास मंत्री कार्यालयाचे विशेष सहकार्य लाभले. व शिवसेनेच्या माध्यमातून पृरतूर शहरातील खराब झालेले रस्ते येणाऱ्या काळात चकचकीत करणार असे आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा परतूर नगरपालिका गट नेते मोहन अग्रवाल यांनी सांगीतले. व्यंकटेश नगर व बालाजी नगर मधील अंतर्गत रस्त्याचे कामे करून दिल्याने या भागातील नागरिक उद्धव शेरे, दिनेश चिकने ,विकास यादव ,रामजी सुरवसे ,दत्ता ठोंबरे, विल्सान सुतार ,शिवाजी खरात, दिपक हिवाळे ,विकास आवारे ,संदीप बनवते, कृष्णा ठोंबरे ,भागवत सुरवसे , व आदींनी समाधान व्यक्त केले.व अग्रवाल यांच्यासह राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कामाचे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांचा सत्कार केला.