परतूर तालुका

दिवाळी पाडव्या निमित्य म्हशी धावण्याची शर्यत संपन्न

images (60)
images (60)

दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क

गोकुळ मित्र मंडळ परतूर गवळीवाडाच्या वतीने  दिवाळी पाडवा व शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित साधून  म्हशी धावन्याच्या भैव्य शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत  २० म्हशी, व म्हशी मालकांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे. पाटील बोराडे होते,  तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम ,उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड,शिवसेना नेते रामेश्वर नळगे, तालुकाप्रमुख अशोकराव आघाव,नगरसेवक तथा शिवसेना नेते शरीफ कुरैशी उपतालुका प्रमुख रामचंद्र काळे,सुदर्शन सोळंके, शिवसेना शहरप्रमुख दत्ता  सुरुंग, विदुर जईड,डॅ प्रमोद जगताप दलित आघाडी तालुकाप्रमुख मधुकर पाईकराव,गणेश नाना नळगे युवासेना शहरप्रमुख  ,सोनू भोकरे,अल्पसंख्याक शहरप्रमुख अहमद चाऊस, शहर उपप्रमुख दिपक हिवाळे ,विकास खरात, गजानन चवडे,संदीप पाचारे ,आबासाहेब कदम यांची उपस्थिती होती.या मध्ये प्रथम पारितोषिक  महेश  नळगे यांच्या कडून ७००० तर द्वितीय पारितोषिक अमोल शहाणे ५००० रुपये व  तृतीय पारितोषिक शिवसेना शहर प्रमुख दत्ता सुंरुंग  यांच्या कडून ३००० रुपये ठेवण्यात आले होते.  ह्या शर्यतीत प्रथम पोरितोषिक मारोती जाधव आंबा ह्यांनी  पटकावले तर द्वित्तीय पारितोषिक  गोविंद खंडेलवाल व तृतीय पारितोषिक गोविंद माने यांनी पटकावले. कार्यक्रमाचे सुञसंचालन दिपक हिवाळे यांनी केले. म्हशी धावण्याचे शर्यतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंद माने , संदिप शिंदे, गोपाल माने राजाभाऊ ऐकिलवाले ज्ञानेश्वर घाडगे मधुकर ऐकिलवाले कृष्णा गायकवाड गंगाधर घाडगे , महादेव शाम  ऐकिलवाले, नारायण गायकवाड ,सुरेश माने, रामेश्वर जगताप, गोविंद माने, आशोक काळे, सताराम माने ,ऊमेश ऐकिलवाले, आमोल ऐकिलवाले ,आशोक घाडगे,तूकाराम घाडगे , वैजनाथ गायकवाड, शंकर गायकवाड, आमोल काळे व आदीनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!