मंठा तालुका

२२ वर्षानंतर वर्गमित्र एकत्रित
गेट-टु-गेदर – बालपणीचा आठवणींना उजाळा

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद हायस्कूल मधील दहावी १९९८-९९ बॅच वर्गमित्र तब्बल २२ वर्षानंतर एकत्रित आले. पुर्णा पाटी येथील भोलेनाथ गडावर दत्त मंदीर येथे गेट-टु-गेदर ( स्नेहमिलन ) कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . या कार्यक्रमाची संकल्पना ज्ञानेश्वर ढाकणे रा. खुरामपूर , गजानन सरकटे व रविंद्र भावसार तळणी यांना सुचली. त्यानंतर व्हाट्सएपवर ग्रुप तयार केला. या ग्रुपवर एक-एक करत ४० वर्गमित्र ग्रुपवर जोडले गेले. ग्रुपवर चर्चेतून गेट-टु-गेदर ( स्नेहमिलन ) कार्यक्रमाचे आयोजन ७ नोव्हेंबरला ठरले .

images (60)
images (60)

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक डि टी वाठोरे , तर प्रमुख पाहूने म्हणून शिक्षक वाय बी देशमुख , जे वाय खरात , शिक्षक नारायण कांगणे , सी आर वाघमारे , एल जे खरात व दत्त मंदीराचे मठाधिपती चरणसिंग महाराज जनकवार हे होते. यावेळी उपस्थित शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

तब्बल २२ वर्षानंतर वर्गमित्र एकत्र आल्याने सर्वांच्या चेहर्‍यावर आनंद, शाळेतील आठवणींना मनमोकळ्या पणाने व्यक्त करत गळाभेट घेतल्या. या कार्यक्रमात तळणी येथील लष्करातील सेवानिवृत्त सैनिक दत्ता देशमुख, विष्णू मुदळकर व उपस्थित शिक्षकांचा सन्मान केला. गजानन वाघ, समाधान राऊत , अरविंद पिपळे , प्रशांत शिंदे , विष्णु राठोड, भानूदास मगर, शेख अश्पाक यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमान डोईफोडे यांनी केले तर आभार रितेश चंदेल यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी आबासाहेब सरकटे , भागवत मुडतकर, गजानन सरकटे , शिवाजी येऊल , दत्ता देशमुख, दिगंबर लाड, पटिशेन सदावर्ते, राम देशमुख, शाम सरकटे, रामप्रसाद खंदारे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!