त्या हरवलेल्या महिलेचा खून ;आरोपींची कबुली
जालना: इंदेवाडी (ता.जालना) येथील एका विधवा मामे बहिनीच्या खून प्रकरणात सुभाष बापुराव शेरे (वय 30) रा. हरतखेडा ता.अंबड या आतेभावास तालुका पोलिसांनी अटक केली. सदर विधवेसोबत अनैतीक संबंध असतांना ती दुसर्यासोबत संबंध ठेवते व उसने पैसे देण्याचे झझंट संपविण्यासाठी खून केल्याचे सुभाष शेरे यांनी कबुल केले. सदरील खूनाचा पर्दाफाश तालुका जालना पोलिसांनी केला.
24 सप्टेंबर 2021 रोजी इंदेवाडी येथील एक 34 वर्षीय विधवा महिला हरवली असल्याची तक्रार तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात कदीम ठाण्यात बेपत्ताची नोंद आहे. दरम्यान 3 ऑक्टोंबर 2021 रोजी बीड जिल्ह्यातील गेवराई पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याच्या माहितीवरून बेपत्ताची तक्रार देणार विजयमाला चिरखे व तिचा भाऊ प्रकाश देविदास दुनगहू रा. इंदेवाडी यांना घेवून गेवराई येथे जावून प्रेत पाहिले असता, तिच्या अंगावरील कपडे व दागिण्यावरून सदरील महिला विधवा मामेबहिन असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सदरील गुन्हा तालुका पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
याप्रकरणाचा तिक्ष्ण तपास सपोनि सुरेश खाडे यांनी लावला. मयत हिचा मामेभाऊ सुभाष शेरे रा. हरतखेडा ता. अंबड या ट्रक चालकाने केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी सुभाष शेरे यास अटक केली असता, त्याने गुन्हा कबुल केला. व 22 सप्टेंबर रोजी सामनगांव फाटा येथून मोटार सायकलवरून सदर विधवा महिलेचे अपहरण केले. व हरतखेडा शिवारातील प्रल्हाद काकडे यांच्या ऊसाच्या शेतात नेवून तिचा गळा आवळून खून केला. व स्वतःच्या ट्रकमधून प्रेत साथीदाराच्या मदतीने गेवराई तालुक्यातील रांजणी गावाच्या शिवारात धुळे- सोलापुर हायवे रोडच्या कडेला नालीत नेवून टाकला असल्याचे सांगितले.
सदर कामगिरी पोलिस अधिक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मारोती खेडकर, सपोनि सुरेश खाडे, सपोनि विश्वास पाटील, पोलिस अंमलदार राम शिंदे, अशोक राऊत, वसंत धस, कृष्णा भडांगे, अरूण मुंढे, महिला अंमलदार जयश्री नागरे यांनी पार पाडली.