परतूर येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
परतूर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन हाॅटेल” गार्डन रेस्टॉरंट” मध्ये उत्साहात संपन्न झाले.
परतूर येथे 1990 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा 31 वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला,10 वी नंतर प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या शाखांमधून शिक्षण घेण्यासाठी पर्याय निवडतात, त्यामुळे बहुतांश विद्यार्थी 31 वर्षे भेटले नाही मात्र सोशियल मिडीयाच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी 1990 च्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे 10 वि च्या हजेरीपत्रकाची झेरॉक्स प्रत मिळवण्यात आली व त्या माध्यमातून संपर्क करण्यात आले आणि आज 31 वर्षांनंतर सर्व जुण्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला यावेळी उद्धव माने, अंकुश चिखले, राजेश दिरंगे, रामेश्वर तारो, वंदना तारो,मंगल जगताप,निर्मला बांडगे,आल्का बरकुले,कांचण काकडे,शारजा ढवळे, मंगल काजळे,सूनंदा कुंभकर्ण, कल्पना मुंदडा,संगीता अग्रवाल,रत्नमाला शिसोदे यांच्या सह गुंजकर सर,मुजमुले सर,बोनगे सर, शहाणे सर,केकते सर, शहाणे सर,कच्छी सर,सारस्वत सर,खुरपे सर,सरोदे मॅडम यांच्यासह शिवाजी नेमाणे,कमलाकर धुमाळ,मंगलसिंग बैनाडे, राहूल पारगावकर , नारायण डंख , राधाकृष्ण चांदजकर, विनोद कुलकर्णी,रामा चव्हाण,शाम बन्सीले,बाबुलाल कांकरीया, राजेश मोरे इत्यादी विद्यार्थी हजार होते