परतूरच्या रसिकाची हैदराबादेत गरुडझेप !
अन्यालिटिकल सायंटिस्टपदी नियुक्ती
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
येथील रसिका रामेश्वर दिरंगे या विद्यार्थिनींची हैदराबाद येथील रेड्डीज् लॅबोरेटरीजमध्ये संशोधन व विकास विभागात अन्यालिटिकल सायंटिस्टपदी नियुक्ती झाली आहे.दरम्यान, रसिकांच्या या यशामुळे परतूरकरांची मान देखील अभिमानाने उंचावली आहे.
जिल्हा परिषदेचे शिक्षक रामेश्वर दिरंगे यांची रसिका ही मुलगी आहे.रसिकांचे बारावीपर्यंतचे शिक्षण परतूर शहरातच झाले.त्यानंतर औरंगाबाद येथील वाय. बी.चव्हाण फार्मसी कॉलेजमधून तिने बी.फार्म ही पदवी संपादन केली.पुढील शिक्षणासाठी रसिका गुजरातला गेली.अहमदाबाद शहरातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल शिक्षण व संशोधन केंद्र येथे तिने एम.एस.फार्म ही पदवीव्युत्तर पदवी प्राप्त केली.
हैदराबाद येथील रेड्डीज् लॅबोरेटरीमधील संशोधन व विकास विभागात रसिकांची अन्यालिटिकल सायंटिस्टपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.या नियुक्तीमुळे अवघ्या परतूरकरांची मान अभिमानाने उंचावली असून रसिकांचे शहर परिसरात अभिनंदन होत आहे.
रसिका दिरंगे हिने मिळविलेल्या यशाबद्दल परतूरकरांची मान खरोखरच अभिमानाने उंचावली आहे.परतूरसारख्या ग्रामीण भागातील मुली आता शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहेत हे पाहून समाधान वाटते. – दिलीप मगर,आदर्श शिक्षक,परतूर.