परतूर तालुका

स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठाण,सॅक्रेड आणि युनिसेफ याच्या संयुक विद्यमाने बाल दिन साजरा

दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क

images (60)
images (60)

परतूर येथे स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठाण,सॅक्रेड आणि युनिसेफ याच्या संयुक विद्यमाने सुरु असलेल्या बाल संरक्षण प्रकल्पा अंतर्गत ता. १४ नोव्हेबर रोजी बालदिन साजरा करण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी १४ नोव्हेंबर हा भारतात बाल दिन म्हणून साजरा करतात तर २० नोव्हेंबर हा जागतिक बाल अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हा कालवधीत बाल हक्क सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. या सप्ताहात चित्ररथ,कलापथक आणि पोस्टरच्या मध्यामामातून बाल अधिकार, मुलांसाठीच्या यंत्रणा या बाबत समाजातील विविध स्स्तावर जाणीव जागृती केली जाणार असल्याचे संस्थेचे कार्यकारी संचालक भाऊसाहेब गुंजाळ यांनी सांगितले. यावेळी बाल संरक्षण तज्ञ एकनाथ राउत आणि उमेद अभियानाचे व्यवस्थापक गजाजन खरात यांच्या हस्ते चित्ररथाच्ये उदघाटन करण्यात आले. तसेच बाल संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सामजिक कार्यकर्त्याच्या गौरव करण्यात आला. त्यात प्रामुख्याने .एकनाथ राउत, .सोमेश सोनटक्के, भास्कर साळवे,. विठ्ठल सुभेदार आणि संतोष हिवाळे यांना सन्मानित करण्यात आले. १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत मुलांच्या रांगोळी स्पर्धा,हस्तकला स्पर्धा, चित्रकला स्पर्धा , विविध गुणदर्शन स्पर्धा अश्या विविध स्पर्धा तसेच स्वाक्षरी मोहीम आणि पथनाट असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमास जिल्ह्यातील बालमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!