ग्रामसभेला सरपंचाची दांडी तर अनेक सदस्य गैरहजर
जळगाव सपकाळ:—भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे मंगळवारी मारोतीच्या पारावर ग्रामसभेच अायोजन करण्यात अाले होते माञ झालेल्या ग्रामसभेला सरपंच तसेच अनेक सदस्यांनी दांडी मारलेली पाहायला मिळाली त्यामुळे ग्रामसभेचे महत्व सदस्यांनाच नसल्याने ग्रामस्थ सुध्दा मोजकेच पहायला मिळाले असल्याने ग्रामसभा नावालाच झाली असल्याची चर्चा गावामध्ये होत अाहे.
जळगाव सपकाळ येथे मंगळवारी सकाळी दहा वाजेदरम्यान मतदान यादी पुर्णनिरक्षण तसेच पंधरा वित्त अायोग कृती अाराखडा सन २०२२ ते २०२३ नियोजन करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे अायोजन करण्यात अाले होते माञ ग्रामसभेला सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच पदाधिकारी असायला पाहिजे होते माञ येथे गावाचा मुख्य सरपंच तसेच उपसरपंच यांचा या ग्रामसभेत उपस्थीती नसल्याने चर्चेचा विषय ठरला अाहे तर मोजकेच ग्रामपंचायतीचे सदस्य हजर पहायला मिळाले तर अनेक सदस्यांचे पतीराजच सदस्य म्हणुन हजर असतात त्यामुळे ग्रामसभेचे महत्व यांनाच नसल्याने नावालाच ग्रामसभा होतात की काय असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडतो अाहे.तसेच गावामध्ये अनेक मुलभुत सुविधाची समस्या नागरिकांना होत असल्याने याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत अाहे यामध्ये गावामध्ये पिण्याच्या पाण्याची बोंबाबोब अाहे अाठ दिवसानंतर एकदाच नळाला पाणी येते तर लाईट सुध्दा अर्ध्यागावामध्ये अाहे तर अर्ध्या गावामध्ये अंधार पहायला मिळतो यामुळे ग्रामपंचायतीचा सध्यातरी रामभरोसे चालु असल्याने गावात समस्या निर्माण झाली अाहे.