भोकरदन तालुका

सोयगाव देवी परिसरात आढळला अनोळखी तरूणीचा मृतदेह,पोलीसांचा तपास चालु

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन तालुक्यातील जालना रोडवरील लिंगेवाडी फाट्या जवळ सोयगाव देवी शिवारात  एका अनोळखी तरूणीचा मृतदेह आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे, अंदाजित तरूणीचे वय 18.असल्याचे कळते मृतदेहाची ओळख अजुन पटली नाही .

या  विषय पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहीती अशी की दि.१६ मंगळवार रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास लिंगेवाडी फाट्याजवळ अनोळखी तरूणीचा मृतदेह मिळुन आला आहे या विषय परीसरातील नागरीकांनी फोन करून सांगितले होते माहीती मिळताच घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी. इंदलसिंग बहूरे, सह.पो.नि आर के तळवी,सह.पो नि.रत्नदीप जोगदंड, पो.उप निरीक्षक सचिन कापुरे,व पोलिस कर्मचारी यांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह नागरीकांचे मदतीने येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी दिपक सोनी यांनी तपासून मृत घोषित केले दि.१७. बुधवार रोजी शवविच्छेदन करण्यात आले असून रीपोर्ट आल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल सध्या काहीच सांगता येत नाही असे डाॅ.सोनी यांनी सांगितले आहे मृत्यू अवस्थेत आढळून आलेल्या तरुणीच्या तोंडावर. व हातापायावर मार लागलेला आहे.  दरम्यान सदरील तरूणी मागील दोन तीन दिवसापासून सोयगाव देवीगावात व परीसरात या पुर्वी सदरील तरूणीला  नागरीकांनी फिरतांना पाहीले होते सदरील घटनेची आकस्मिक नोंद पोलिसांनी केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!