पिकविम्यातून तळणी मंडळ वगळले कसे ?शेतक-यांत संताप
: अतिवृष्टीनंतर जिल्हाधिकाऱ्यांसह कृषीमंत्र्याचा दो-या
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी महसूल मंडळात अतिवृष्टी व पुर्णेला पूर आल्याने शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्य शासनाने जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीतील शेती पिकांची नुकसान भरपाई शेतक-यांच्या खात्यावर अनुदान जमा केले. मात्र , केंद्र सरकारच्या चुकीचे धोरण व इशूरन कंपनीचा बदमाशपणामुळे पिकविम्यातून तळणी महसूल मंडळ वगळण्यात आल्याने शेतक-यांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तळणी मंडळात दोनदा अतिवृष्टी व विर्दभातील खडकपुर्णा’तून १ लाख १७ हजार क्युसेक वेगाने एकाच वेळी पाणी सोडल्याने पुर्णेला पूर आल्यानंतर शेतीसह पिके पाण्याखाली होती. त्यानंतर पिकविम्यातून तळणी महसूल मंडळ वगळण्याच्या निषेधार्थ युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोण जबाबदार …?
तळणी महसूल मंडळ पिकविम्यातून वगळण्यात कारणीभूत केंद्र सरकारचे चुकीचे धोरण व इशूरन कंपनीचा बदमाशपणा व कृषी विभागाचा हलगर्जीपणा जबाबदार कोण ? असा आरोप कानडीचे शेतकरी आश्रुबा खंदारे , तळणीचे प्रभूसिंग चव्हाण यांनी केला.
कृषीमंत्र्याचा दो-या …
अतिवृष्टीनंतर शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीची जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड व कृषीमंत्री दादा भूसे यांनीही पाहणी केली होती.
कृषी अधिकाऱ्याचे मोबाईल बंद …
याबाबत मंठा तालुका कृषी अधिकारी व्हि जे राठोड , तळणी कृषी मंडळ अधिकारी राहुल आघाव यांना संपर्क केलानंतर मोबाईल बंद आढळून आला. तर कृषी सहाय्यक विजय खोडके यांना विचारले असता , तळणी मंडळ पिकविम्यातून कसे वगळले ? असे शेतकरीही मलाही विचारात आहेत. याबाबत वरिष्ठांना विचारला असे खोडके म्हणाले.