शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ४३ रक्तदात्यांनी केले रक्तदान..
कुलदीप पवार/कुंभार पिंपळगाव
घनसावंगी येथील डॉ.हिकमत उढाण शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे आज दि.(२०) शनिवार रोजी रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबिरासाठी ४३ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला.
शिवसेना युवासेना साेशलमिडिया आयाेजित रक्तदान शिबिराचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा पुजन करून रक्तदानास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी रक्तदात्यांचा रुमाल,पुष्पगुच्छ व प्रमाणपञ देउन गौरविण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख उद्धव मरकड,गटनेते अनिरुद्ध शिंदे,शंतनु उढाण,नगरसेवक मुजायद भाई,फय्याज भाई,अनिल सानप,संदिप कंटुले
राम बिडे, माउली दहिभाते सह शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित हाेते.
हे शिबिर संपन्न हाेण्यासाठी युवासेनेचे रवि शिंदे साेशलमिडीया तालुकाप्रमुख धर्मराज आंधळे,एजाज पठाण,माउली उंबरे,अक्षय उगले,ईद्रजित भाेसले,तपाेवन काळे,विजय साखरे,तोफिक शेख,नकुल दहिभाते,राहुल भाेसले,शुभम काेरडे,अभिजित आधुडे,नकुल काकडे सह अनेकांनी सहकार्य केले.