भोकरदन: अभियात्रिकी पदवीका शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू
रवींद्रकुमार लोखंडे/पारध (ता भोकरदन)
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध येथील १७ वर्षीय तरुणीचा रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.
दिवाळीच्या सुट्टीत घरी आलेल्या अबंड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका सतरा वर्षीय मुलीचा बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली आहे.सदर घटनेत मृत झालेल्या तरुणीचे नाव सरला कौतीकराव लक्कस (१७)असे आसुन ती भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द येथील रहिवासी आहे.
घरची परिस्थिती जेमतेम असल्याने लहानपणापासूनच सरलाला परिस्थितीत बदलाव आणण्याची मनापासून ईच्छा होती.शिवाय ती आपल्या आई-वडीलांना आणि नातेवाईकांना याबाबत बोलत देखील असे.आणि तिने त्या दिशेने वाटचाल सुरू करुन अभ्यासात लक्ष देऊन दहावीच्या परिक्षेत चांगले गुण संपादन करुन अंबड येथील शासकीय अभियांत्रिकी पदवीका महाविद्यालयात प्रवेश देखील मिळवला होता.
पंरतु दिवाळी सुट्टीत घरी आल्याने बुधवारी तीला एकदमच ताप व उल्ट्या तसेच अचानक दुखु लागल्याने वडीलाने सरलाला बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.पंरतु गुरूवारी सरलाची प्रकृती आणखीच बिघडल्याने शनिवारी सरलाची प्राण ज्योत उपचारा दरम्यान मालावली.
सरला घरात सर्वात हुशार व कष्टाळु मुलगी असल्याने गावात सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.शुक्रवारी दुपारी सरलावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.तिच्या पाश्चात्त्य आई-वडील,एक भाऊ,तीन बहिणी असा परिवार आहे.सरलाच्या जाण्याने तिचे अधिकारी बनण्याचे स्वप्न अधुरे राहीले असल्याचे तिच्या शिक्षकांनी यावेळी सांगितले.