भोकरदन तालुका

भोकरदन तालुक्यात शेतकर्यांना कृषीदुतांचे मार्गदर्शन

आधुनिक तंत्रज्ञान वापरुन शेती कशी करावी व शेतकर्यांचे उत्पन्नात वाढ कशी होईल यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, अंतर्गत दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव , यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीदुत पवन मधुकरराव सहाने, सागर सोनुने, वैभव कोलते यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना विषमुक्त शेती कशी करावी यांचे मार्गदर्शन केलं.

images (60)
images (60)


कृषीदूत असे सांगतात की जर आपण रसायन युक्त खतांचा व कीटकनाशके वापरल्यास की अनेक आजरांना आपण आमंत्रण देतो आणि त्यांच्या आर्थिक भुर्दंड आपल्याच खिशावर पडतो.जर आपण विषमुक्त शेती कडे वळालो तर आपल्याला अधिक आर्थिक भुर्दंड सहन करण्याची गरज भासणार नाही .विषमुक्त शेती साठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहे त्या आपल्या शेतात सहज उपलब्ध असतात जसे की दशपर्णी अर्क बनवणे बीजमृत तयार करणे .
जसे की विषमुक्त शेती कडे जर वळालो तर आपल्या गायी पाळाव्या लागतात तर गायी पासून आपण दुधाचे उत्पन्न तर घेऊ शकतो आणि गायी पासून निघणारे शेण गोमुत्र आपण विकु शकतो कारण की विषमुक्त शेतीमुळे शेण आणि गोमूत्र यांना मागणी वाढली आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अधिक वाढ होईल असे कृषिदूत सांगतात . यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!