दानापुर येथे २७० रुग्णांनी घेतला मोफत नेत्र तपासणीचा लाभ
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन तालुक्यातील दानापूर येथे हयात हॉस्पिटल व जिजाऊ ग्रामीण मित्र मंडळ, भोकरदन/जाफ्राबाद तसेच श्री गणपती नेत्रालय जालना, यांच्या संयुक्त विघमानाने मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन दानापूर येथील हयात हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. शिबिरानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. सुरेखाताई संजयजी लहाने जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस जालना, व प्रमुख पाहुणे शेख मोबिन सरपंच, अनिल शिंदे उपसरपंच दानापूर, तसेच मराठी पत्रकार संघाचे पत्रकार उपस्थित होते. या ठिकाणी श्री गणपती नेत्रालयातील डॉ. शुब्धा व त्यांची 10 जणांची तज्ञ टीम आली होती. त्यांच्या कडून 270 रुग्णांनी आपले डोळे तपासून घेतले, या पैकी 85 रुग्णांची मोफत शास्त्रक्रिये साठी निवड करण्यात आली, 77 रुग्णांना चष्मा लावण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. हयात हॉस्पिटलचे डॉ. नदीम एस.शेख व डॉ. सना एन. शेख यांनि आपल्या हॉस्पिटलमध्ये मध्ये अश्या प्रकारचे वेग वेगळे शिबीर जनसेवे साठी करण्याचे आश्वासन सर्वांना दिले. या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व जनतेने शिबिराचा लाभ घेतला.