आमदार दानवेंनी महावितरणला खडसावताच,१७ गावातील शेतकऱ्यांचा विज पुरवठा सुरळीत
गोकुळ सपकाळ/जळगाव सपकाळ
भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील विद्युत उपकेंद्रावरुन १७ गावातील ३२२ विद्युत रोहीञावरील ३ हजार ८०० शेतकर्यांचा शेतातील विघुत पुरवठा महावितरणने मागील सहा दिवसांपासुन खंडीत केलेला होता त्यामुळे शेतकर्याची रब्बी पिके विहिरीत पाणी असुनही धोक्यात आली होती.सदर बाब तालुक्याचे आमदार संतोष दानवे हे जळगाव सपकाळ येथील मयत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना सात्वनपर भेट देण्यासाठी आले असता गावातील तसेच परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी यांनी आमदार संतोष दानवे यांच्या समोर मांडताच आमदार दानवे यांनी शेतकऱ्यांसमोरच महावितरणन अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावत जोपर्यंत तुम्ही विद्युत पुरवठा सुरळीत करीत नाही तोपर्यत मी याच गावात उपषोणला बसणार असल्याचे सांगताच महावितरणने लगेच परिसरातील शेतकऱ्यांचा विज पुरवठा सुरळीत केला.त्यामुळे शेतकरी समाधानी झाले आहेत. शेतकऱ्यां महावितरणने अाठ दिवसांपासुन अामच्या शेतातील विघुत पुरवठा करणारे रोहिञ बंद केलेले असल्याने पाण्याअभावी रब्बी पिके धोक्यात अाली असल्याचे सांगितले तसेच विजबिलासाठी महावितरणने अाडमुठे धोरण स्वीकारल्याने अाम्ही शेतकरी हताश झालो असल्याचे सांगितले तसेच महावितरणचे विजबिल अाम्ही शेतकरी टप्याटप्याने भरु असे सांगितले
लगेच अामदार दानवे यांनी महावितरणच्या अधिकार्यांना फोन व्दारे जळगाव सपकाळ परिसरातील शेतकर्यांचा खंडीत केलेला वीजपुरवठा जो पर्यत तुम्ही सुरळीत करुन देत नाही तोपर्यत मी या गावातच ठाण मांडुन बसणार असल्याचे सांगितले व लगेच एक तासाच्या अात महावितरणच्या अधिकार्यांनी शेतकर्यांचा खंडीत केलेला वीजपुरवठा सुरुळीत चालु करुन दिला असल्याने शेतकर्यांनी अामदार दानवे यांचे अाभार मानले असल्याचे शेतकरी वर्गाने शब्दांत बोलुन दाखवले.
“अामच्या शेतातील रोहिञावरील विज पुरवठा रब्बी हंगामामध्ये महावितरणने अाठ दिवसांपासुन खंडीत केलेला होता त्यामुळे रब्बी पिके धोकयात होते माञ अामदार संतोष पा.दानवे जळगाव सपकाळ येथे अाले असता अाम्ही त्यांना याविषयी माहिती दिली असता दानवे यांनी लगेच फोनव्दारे महावितरणच्या अधिकार्यांना खंडीत केलेला विजपुरवठा सुरळीत पणे सुरु करण्याचे खडसावुन सांगताच अामच्या शेतातील रोहिञाचा विजपुरवठा सुरु करण्यात अाल्याचा जळगाव सपकाळ येथील शेतकरी हेमंत सपकाळ यांनी सांगितले.