माळेगाव येथील युवकांचे महावितरण विभागाला निवेदन
मधुकर सहाने : भोकरदन
माळेगाव वाड्या वस्ती, ता. भोकरदन, जि. जालना या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सिंगल फेज डीपी पासून वंचित आहे, या गावातील नागरिकांनी आपल्या महावितरण विभागाला अनेक वेळा मागणी करून देखील त्यांना रोहित्र उपलब्ध झाले नाही, त्यामुळे नागरिकाना रोहित्र उपलब्ध करून द्यावे म्हणून आज महावितरण मुख्य अभियंता तुरे पाटील यांना गजानन भालेकर यांनी निवेदन दिले.
याप्रसंगी मुख्य अभियंता हे म्हणाले की, माळेगाव या गावातील मुंजोबा वाडी, विठ्ठल वाडी, म्हसोबावाडी साठी रोहित्र (डीपी) मंजूर झाले असून काही तांत्रिक अडचणीमुळे रखडले आहे, तरी येत्या 15 दिवसांमध्ये माळेगाव या गावात रोहित्र बसविण्यात येईल असे आश्वासन महावितरण मुख्य अभियंता तुरे पाटील यांनी गजानन भालेकर यांना दिले.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माळेगाव वस्ती वाड्या, ता. भोकरदन, जि. जालना या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सिंगल फेज डीपी पासून वंचित आहे, या वाड्यावरील नागरिकांनी आपल्या महावितरण विभागाला अनेक वेळा मागणी करून देखील त्यांना रोहित्र उपलब्ध झाले नाही, त्यामुळे या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, या वाड्यामध्ये शेतकरी वर्ग आहे, शाळेकरी मुलांना कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्यामुळे शिक्षण देखील ऑनलाईन पध्दतीने झाल्यामुळे मुलांना शिक्षण घ्यावे लागते परंतु वाड्या मध्ये रोहित्र नसल्यामुळे लाईट नसते त्यामुळे मोबाईल चार्ज करायचा कसा हा देखील प्रश्न पालक व विद्यार्थ्यांना पडला आहे, तसेच थ्री फेज लाईट सुरळीत करावी कारण शेतकरी वर्गांना देखील शेतामध्ये पिकाला पाणी द्यावे लागते तर त्यांनी पिकाला पाणी कसे द्यावे हा देखील प्रश्न शेतकरी वर्गांना पडला आहे. पीक जगले तर शेतकरी जगेल, आणि विद्यार्थी घडले तर देश घडेल.
यावेळी गजानन पाटील भालेकर(समाजसेवक), अतुल जामुंदे,आकाश शिंदे, ज्ञानेश्वर जामुंदे, विनायक जामुंदे, गजानन जामुंदे, अमोल कावळे, रवी कावळे, विजू जामुंदे, किशोर जामुंदे, किरण साळवे, रवी जामुंदे, अदिंच्या या निवेदनावर साक्षर्या आहे.