७७ हेक्टर गायरान जमिनीवरील अतिक्रमण ग्रामसभेच्या ठरावानंतरही हटेना?
औरंगाबाद उच्च न्यायालयाने सुध्दा दिले होते अतिक्रमण हटवण्याचे आदेश.
जळगाव सपकाळ/गोकुळ सपकाळ
भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील गायरान जमिनीवर अनेकांनी अतिक्रमण केले व त्यावर ताबा केला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अतिक्रमण काढणे बाबत बाबुराव रामभाऊ सपकाळ यांनी २०१७ ला याचिका दाखल केली होती त्या अनुषंगाने याचिकेच्या सन २०१९ ला सुनावणीदरम्यान न्यायालयाने सदरील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हे तात्काळ अतिक्रमण धारकांनी काढण्यात यावे असा आदेश देण्यात आला होता तसेच संबंधित गायरान वरील अतिक्रमण हटविण्याविषयी ग्रामपंचायत व तहसीलदार यांना सुद्धा अादेश देण्यात आला होता त्यामुळे गायराण जमीनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामपंचायतीने १३ अाॅक्टोबर रोजी ग्रामसभा घेवुन १ डिसेंबर रोजी अतिक्रमण हटवण्याचा ठराव पारित करुन तसा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवुन संबधित गायरान वरील अतिक्रमण काढण्याचा ठराव घेतला माञ १ डिसेंबरला अतिक्रमण हटले नसल्याने न्यायल्याच्या अादेशाला तसेच ग्रामसभेच्या ठरावाला प्रशासनाने ठेंगा दाखवला काय असाच प्रश्न नागरिकांना पडला असल्याचे यावरुन दिसुन येत अाहे. जळगाव सपकाळ येथे गट नंबर ११३८ ,५५६, ५६४,६२४ शासकीय गायरान जमिनीवर गावातील अनेक ग्रामस्थांनी अवैधरित्या अतिक्रमण केले असून ७७ हेक्टर गायरान जमीन पूर्णपणे अतिक्रमणित झाली आहे
जळगाव सपकाळ या गावातील गायरान जमिनीवर अवैधरित्या अतिक्रमण झालेले असून त्या विरोधात बाबुराव रामभाऊ सपकाळ यांनी २०१७ साली जनहित याचिका दाखल केली होती .
त्यात अनेक अतिक्रमणधारकांनी गायरान जमीन अतिक्रमण केली आहे. सदर जमिनीची दहा वर्षांपूर्वी रितसर शासकीय मोजणी झाली आहे. जनहित याचिका ग्राह्य धरून जळगाव सपकाळ येथील असलेले शासकीय जमिनीवरील अतिक्रमण तत्काळ हटवावे असे आदेश उपविभागीय कार्यालय यांना देण्यात आले होते तसेच तीन महिन्याच्या आत अतिक्रमण काढून त्याचा खुलासाही देण्यात यावा असे आदेशात म्हटले आहे. त्यावेळेस २०१९ मध्ये तत्कालीन सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली होती ग्रामसभेत सविस्तर चर्चा करून उपविभागीय अधिकारी यांना कळविण्यात आले होते परंतु या वेळेस उपविभागीय अधिकारी तहसीलदार गट शिक्षणाधिकारी यांनी अतिक्रमण हटवण्याचा चेंडू ग्रामपंचायतीच्या कोर्टात लोटला असून ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटवावे ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन अतिक्रमण हटवण्याबाबत एक तारीख निश्चित करावी व पोलिस संरक्षणाखाली सर्व अतिक्रमण हटवावे त्या अनुषंगाने ग्रामसभेत गांवकरी यांनी अतिक्रमण हटवण्याचा ठराव मंजूर केला होता माञ एक डिसेंबर २०२१ रोजी अतिक्रमण हटले नसल्याने गायरान जमीनीवरील अतिक्रमण हटणार की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला अाहे.
“काय म्हणतात अधिकारी”
“याविषयी ग्रामविकास अधिकारी महेंद्रकुमार साबळे यांना विचारले असता गायरान वरील अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळाले नसल्यामुळे अतिक्रमण हटवले नाही तसेच तलाठी,मंडळअधिकारी मिळुन पुढील तारीख ठरवुन अतिक्रमणाविषयी निर्णय घेवु असे सांगितले.
“पारध पोलीस स्टेशनचे एपीअाय अभिजीत मोरे यांना गायरान अतिक्रमण हटविण्याच्या बंदोबस्त देण्याविषयी विचारले असता अाम्हाला तहसिल प्रशासनाकडुन बंदोबस्ता विषयी त्यांनी काल वाॅटसअॅपला पञ पाठवल्याचे म्हणतात माञ गायरान हटवण्याच्या एकदिवस अगोदरच पंचवीस तीस पोलीस कर्मचारी अाणायचे कुठुन असा प्रश्न पडला तहसील प्रशासनाने अगोदर लेखी अादेश पाठवले असते तर अाम्ही वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करुन पोलीस कर्मचार्यांचा फौजफाटा मागवला असता असे सांगितले.
“गायरान जमीनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्त नसल्याने पुढील तारीख ठरवुन अतिक्रमण काढण्याविषयी निर्णय घेवु असे महसुल मंडळ अधिकारी एकनाथ सोनवणे यांनी सांगितले.