भोकरदन तालुका

कापसाच्या शेतात पिकविला गांजा,नळनीवाडी शिवारातून 40 लाखाचा दोन क्विंटल गांजा जप्त

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन तालुक्यातील नळनीवाडी येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतात उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांनी शनिवारी सायंकाळी अचानक धाडी टाकल्या.या धाडीमध्ये कापसाच्या पिकामध्ये गांजाचे पीक घेतल्याचे आडनावे आढळून आले.जवळजवळ असलेल्या तीन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तब्बल दोन क्विंटल ओला आणि सुका गांजा आढळून आला आहे.

गांजाची झाडे उपटून जप्त करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती हा गांजा अंदाजे दोन क्विंटल असून त्याची अंदाजे किंमत 40 ते 45 लाख रूपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ही कामगिरी भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे, भोकरदनचे सपोनि. रत्नदीप जोगदंड, हसनाबादचे सपोनि. संतोष घोडके, सपोनि. मंजुषा सानप, पोउपनि. सचिन कापुरे, पोउपनि. युवराज पाडळे, सपोउपनि. आसेफ शेख, पोना. गणेश पायघन, पोना. अभिजित वायकोस, पोकाँ. एकनाथ वाघ, गणपत बनसोडे ,सतीश लोखंडे अनिल जोशी ,समाधान जगताप आदींनी पार पाडली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!