भाजपच देशासह राज्यात सर्वांत मोठा पक्ष:
खा. रावसाहेब दानवे.
जळगाव सपकाळ प्रतिनिधी : भाजप हाच देशात व राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा केंद्रीय रेल्वे व कोळसा खनिकर्म राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे केंद्रीय रेल्वे व कोळसा खनिकर्म राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे यांच्या नगरी सत्कार व पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून जिल्हा परिषद सदस्या आशाताई पांडे, सुनिताताई सपकाळ, जि. प. सदस्य विठ्ठलराव चिंचपूरे, सुभाष देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कौतिकराव जगताप, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन गणेश ठाले, प.स. माजी सभापती विलास आडगावकर, विनोद गावंडे, शिवनाचे जि. प. सदस्य गजानन राऊत, अरूण काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आन्वा सर्कल मधील असंख्य शिवसेना कार्यकर्त्यांनी खा. रावसाहेब दानवे यांच्यावर विश्वास ठेवून संजय गांधी निराधार समितीचे सदस्य घनश्याम विसपूते, माजी गटशिक्षण अधिकारी तथा ग्रामपंचायत सदस्य देवराव पांडव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी उपस्थित आशाताई पांडे, विठ्ठलराव चिंचपूरे, यांची भाषणे झाली. दरम्यान खा. रावसाहेब दानवे म्हणाले की, राज्यात पक्षाची शक्ती वाढली असून जिल्ह्यातही भाजप मोठा पक्ष आहे. पुढे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक येणार असल्याने या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सर्वच उमेदवार निवडून येईल यासाठी तरुण वर्गांनी जोरात कामाला लागावे असे आवाहन देखील केले,
या कार्यक्रमाला आन्वा, जळगाव सपकाळ, आव्हाणा जिल्हा परिषद सर्कल मधील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.