आर.सी.सी.मित्र मंडळातर्फे महामानवाला अभिवादन
दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क
परतुर रेल्वे स्टेशन येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आर.सी.सी.मित्र मंडळ परतुरच्या वतीने ता.६ रोजी आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी रेल्वेचे असिस्टंट सब इंस्पेक्टर जयप्रकाश चव्हाण यांनी दीप प्रज्वलन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले तसेच आर.सी.सी.मित्र मंडळाचे मार्गदर्शक राहुल नाटकर व बाळू कदम यांनी सामुदायिक बुद्धवंदना घेतली. तसेच दोन मिनिट शांत उभे राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर सरनतय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी आर.सी.सी.मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रदीप साळवे, रमेश कदम,संतोष कदम ,नरेश कांबळे, रवी इंगळे,दिपक हिवाळे, नरेश सोनवणे, पत्रकार अशोक ठोके व आदी बौद्ध आनुयाई उपस्थित होते.