गोदकाठच्या रस्त्यावर खडी-मुरूम टाकुन बोळवण,मात्र चार महिन्यातच रस्ता उखडला
पालकमंत्र्याचे लाडके गाव फक्त बोलण्यापुरतेच ; मात्र गावाला रस्ताच नाही
घनसावंगी प्रतिनिधी / नितीनराजे तौरपाटील
गोदकाठच्या गावांतील ग्रामस्थांनी पालकमंत्री व सलग तीन वेळा कॅबिनेट राहिलेल्या राजेश टोपे यांना गेल्या निवडणुकीत आम्हाला काही नको फक्त गावाबाहेर जाण्यासाठी रस्ते करून द्या अशी कळकळीची विनंती केल्याने आश्वासन दिले मात्र दोन वर्षाच्या पाठपुराव्यानंतर 15 किमी ऐवजी कसा बसा 1400 मीटर रस्ता खडी-मुरूम टाकून केला मात्र चार महिन्यातच रस्त्यावरील खडी पूर्णपणे उखडली असुन रस्त्याने दुचाकी व चारचाकी चालवणे देखील जिकरीचे झाले आहे तर नेहमी गावात पालकमंत्री लाडके गाव म्हणून शिवणगावला संबोधतात मात्र प्रत्यक्षात गावाला रस्ता सुद्धा नाही हे विश्वास ठेवण्या पलीकडचे आहे.
घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव हे गाव तालुक्याच्या नकाशावर आहे कि नाही जर असेल तर हे गाव रस्त्यापासून कायमच वंचित का असा सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे.
तसेच दरवेळी विधानसभा, लोकसभा, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक आली की,विविध पक्षांचे उमेदवार येउन घोषणा करतात मात्र या गावांच्या अडचणी कोणीही सोडवल्या नाही तर घोषना ऐकूनच समाधान मानून घोषणा पुर्ण झाल्या असे ग्रहित धरायचे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तर आज पर्यंत ची कुंभार पिंपळगाव ते शिवणगाव रस्त्याचे काम आजपर्यंत कधीच एकत्रित रित्या पुर्ण झालेले नाही त्यात आठशे ,नउशे मीटरचे रस्ते करून सहा महिन्यात उखडतात मग असे रस्ते द्यायचे असतील तर त्यापेक्षा कायम विनारस्त्याचे राहणेच योग्य ठरेल.
यामुळे परिसरातिल गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून निवडणुकीपूर्वी जर रस्ते झाले नाही तर याचे पडसाद येत्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणूकित नक्कीच दिसतील असा अंदाज आहे.
तसेच शिवणगाव हे गाव अंतरवाली टेंभी सर्कल मध्ये येते आणि या सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य हे या गोदकाठ रस्त्यासाठी कधी प्रयत्नशील दिसलेच नाही यामुळे आता राष्ट्रवादी साठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेची निवडणूक धोक्याची ठरणार हे नक्की झाले आहे तर पक्षाचे प्राबल्य कायम ठेवण्यासाठी आता गोदाकाठ व शिवणगाव रस्त्याचा प्रश्न निवडणूक पूर्वी मार्गी लाऊन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते केल्यास यामध्ये बदल होण्याची शक्यता दिसते आहे.
खराब रस्त्यामुळे हरिनाम सप्ताहासाठी महाराज येइना
शिवणगाव,भादली या गावात गेल्या ३६ वर्षापासून भव्य असा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने मोठ्या भक्तीभावाने केले जाते या सप्ताह दरम्यान नामांकित महाराजांची कीर्तने होतात त्यासाठी परिसरातुन भाविकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असतो मात्र शिवणगाव रस्त्यावरची रेती आणि खडी त्यात उस वाहतूक करण्यासाठी कारखान्याकडुन माती आणि मुरुम टाकून खड्डे बुजवले होते यामुळे धुळीचे साम्राज्य वाढले असल्याने येणाऱ्या भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.तर यावर्षी अनेक महाराजांनी रस्त्याअभावी किर्तनासाठी येण्यास नकार दिला असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे.