शिवसेनेच्या अंगावर आले तर शिंगावर घेउ- माजी आमदार संतोष सांबरे
भाजपची मुजोरी शिवसैनिक सहन करणार नाही – भरत सांबरे
बदनापूर / बदनापूर नगर पंचायत निवडणुकीसाठी आज दिनांक 21 डिसेंबर रोजी शहरातील 12 वार्डासाठी मतदान घेण्यात आले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तिनी पक्षात माजी आमदार संतोष सांबरे यांनी समन्वय घडवून आणत बदनापूर शहरात निवडणुकीसाठी महा विकास आघाडीची स्थापना केली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्येक वार्डात मतदारांशी संवाद साधत शहरात महाविकास आघाडी चा प्रचंड झंझावात निर्माण केला. राज्य मंत्री मंडळातील माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार कैलास गोरंटयाल, आमदार अंबादास दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, राजाभाऊ देशमुख, डॉ. निसार देशमुख, राजेंद्र राख आदी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा कॉर्नर बैठक तसेच मतदार संवाद पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना माजी आमदार संतोष सांबरे म्हणाले की शहरात महा विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला भाजपा आमदार नारायण कुचे यांनी बोगस नावांच्या आधारे शहरातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु शहरातील सुज्ञ जनता महा विकास आघाडीच्या पाठीशी भक्कम पणे उभी असल्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित असून यामुळे भाजपा आमदार नारायण कुचे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे तसेच बाहेर गावच्या नागरिकांचे अनेक वार्डात नावे टाकून शहरवासी यांमध्ये संभ्रम निर्माण केला आज मतदान केंद्रावर संबंधित बोगस मतदारांना घेऊन मतदान करण्याचा प्रयत्न केल्याने मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला होता याची माहिती माजी आमदार संतोष सांबरे यांना समजल्यानंतर त्यांनी महा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि तणाव निवळला. शहरातील अनेक वार्डात बोगस मतदान करण्याच्या आ. कुचे यांचा उद्देश सफल न झाल्याने त्यांनी मतदान केंद्राबाहेर मुजोरीची भाषा करत केंद्राबाहेर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला परंतु महाविकास आघाडीच्या एकजुटीने त्यांना यश आले नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे कुचेच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी शहरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु महाविकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शांततेची भूमिका घेतल्याने तणाव निवळला. भाजप आमदार कुचे हे वाचाळवीरअसल्याने विधिमंडळातुन निलंबित झालेले आहे.त्यांना बोलण्याचे कुठलेही तारतम्य नसून अत्यंत गलिच्छ भाषा व शिवीगाळ करत असल्यामुळे विधानसभा मतदारसंघातील जनतेमध्ये आ. कुचेविषयी प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. भाजप आमदाराची मस्ती उतरवील्याशिवाय स्वस्थ बसणार नसून आमच्या अंगावर आल्यास शिंगावर घेऊ असे प्रतिपादन माजी आमदार संतोष सांबरे यांनी केले.
यावेळी युवा सेना जिल्हासमन्वयक भरत सांबरे म्हणाले की, भाजप आमदार नारायण कुचे हे वार्ड क्रमांक 02 व वार्ड क्रमांक 12 मधील मतदान केंद्रावर बोगस मतदारांना घेऊन त्यांचे मतदान करन्याचा प्रयत्न करत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मी आमदार कुचे यांना याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी मुजोरीची भाषा वापरल्याने शाब्दीक बाचाबाची झाली असून त्यामुळे मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता. माजी आमदार संतोष सांबरे यांच्या आवाहनानंतर दोन्ही गटात शांतता निर्माण झाली. भाजपची मुजोरी शिवसैनिक कदापि सहन करणार नसल्याचेही भरत सांबरे म्हणाले.
यावेळी माजी आमदार संतोष सांबरे यांच्या समवेत राजेंद्र जैस्वाल, मतीन शेख, देवजी जऱ्हाड, सुभाष मगरे, चौधरी, फेरोज शेख, पांडुरंग जऱ्हाड, भरत सांबरे, मोबीन खान, श्रीमंत जऱ्हाड, राजेंद्र जऱ्हाड, सुनील बनकर, कैलास खैरे, कडुबा कराळे, शिवाजी कराळे, एकबाल शेख, युनुस शेख, अन्वर शेख, संजय बळप, आनंद इंदानी, कैलास दुधानी विजय झारे, सुरेंद्र श्रीसुंदर, इलिया कांबळे, महेश शेजुळ, वजीर शेख, पंकज जऱ्हाड, राहुल जऱ्हाड, सय्यद इम्रान, शेख जावेद, शफी इनामदार, तारेख शेख, मुजीब शेख, अमोल सोनवणे, विनोद साबळे, विलास साबळे आदींची उपस्थिती होती