औरंगाबाद

औरंगाबादेत ओमायक्रॉनचा शिरकाव, दोन रुग्ण आढळले


औरंगाबाद
करोना विषाणुच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिअंटचे दोन रुग्ण औरंगाबाद शहरात आढळून आले आहेत. मुळची औरंगाबादची रहिवासी असलेल्या पण इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या एका युवतीचा जिनोम सिक्वेंन्सिंग चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तिच्यावर मुंबईत उपचार केले जात आहेत. औरंगाबादेत आलेल्या तिच्या वडिलांचा जिनोम सिक्वेंन्सिंगचा अहवाल आता पॉझिटिव्ह आला आहे.

images (60)
images (60)

त्याच बरोबर दुबईहून आलेला आणि सिडको एन ७ भागात राहणाऱ्या एका व्यक्तीचा जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहरात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, नियम पाळावेत असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!