दीन-दलित दुबळ्यांचा सेवेबरोबरच आपण मतदार संघात अनेक विकास कामे केली- माजी मंञी बबनराव लोणीकर
परतवाडी तालुका परतुर येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता.
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
आपण पांडुरंगाचे भक्त असून या भक्ती मधूनच राजकारणाच्या माध्यमातून आपण दीनदलित दुबळ्या ची सेवा करू शकलो असे उद्गार माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी काढले
ते परतवाडी तालुका परतुर येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की आपण पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री असताना संधीचे सोने करीत अनेक विकासात्मक कामे केले यामध्ये मृत असलेल्या पाणीपुरवठा विभागाला नवसंजीवनी देत राज्यभरात 18000 गावामध्ये पाणीपुरवठा योजना केल्या त्याचबरोबर माझ्या मतदारसंघांमध्ये आज वॉटर ग्रीड च्या माध्यमातून सुमारे दीडशे गावांना फिल्टर चे पाणी मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले पुढे ते म्हणाले की राज्यभर यामध्ये दीनदलित दुबळ्या गरीब कुटुंबांना 70 लाख शौचालय बांधून दिली असे सांगतानाच मतदार संघातील प्रत्येक गावांमध्ये डांबरीकरणाचे रस्ते केले वैयक्तिक लाभाच्या शेतकऱ्यांसाठी च्या विविध योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या मतदारसंघांमधील निराधारांचा आधार बनत 11000 निराधार विधवा अपंगांना मानधन सुरू केले असेही यावेळी बोलताना ते म्हणाले
मी खरा वारकरी पंथाचा मात्र राजकारणात आलो
माझ्या घरामध्ये असलेले धार्मिक वातावरण माझे वडील नियमितपणे आषाढी-कार्तिकीच्या वारीला जात असत त्यांचे संस्कार माझ्यावर असून मी जर राजकीय क्षेत्रात आलो नसतो तर नक्कीच हरी कीर्तनाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली असती असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
पुढे ते म्हणाले की माझे वडील अनेक नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनामध्ये अभंगाच्या माध्यमातून सेवा करत होते आणि माझा ही तोच पिंड आहे मात्र मी राजकीय क्षेत्रात असल्यामुळे समाजसेवेला ईश्वराची सेवा समजून अहोरात्र काम करत असतो असेही यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले
यावेळी ह भ प अच्युत महाराज दस्तापुरकर, गणेश महाराज आढे पंचायत समितीचे सभापती रंगनाथ येवले ,पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद थोरात, मधुकरराव खरात भीमराव महाराज जाधव, सिताराम राठोड,रामेश्वर आडे,सचिन आडे माजी सरपंच, सुधाकर जाधव पत्रकार संघ अध्यक्ष आष्टी, ज्ञानेश्वर सोळंके सुभाषराव आढे लक्ष्मणराव आढे, शेषराव आढे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक, महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती..!!