जळगाव सपकाळ गावात पोलीस बंदोबस्तात सिंचन विहिरीचे उदघाटन
जि.सपकाळ/जळगाव सपकाळ:—भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे शासकीय गायरान जमीनीमध्ये मनरेगा अंतर्गत पाणीपुरवठा सिंचन विहीरीच्या कामाचे उदघाटनासाठी गेलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंच ग्रामसेवक यांना गायरान लगत असलेल्या शेतकर्यांनी या ठिकाणी अामची शेतजमीन असल्याचे सांगितल्याने विहीरीचे उदघाटन करु नका अगोदर जमीनीचे मोजमाप करा असे सांगितले त्यामुळे येथे काही काळ गोंधळ निर्माण होऊन अखेर पारध पोलीस स्टेशनचा फौजफाटा बोलवण्यात अाला होता.
जळगाव सपकाळ गावासाठी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विभागीय अायुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेनुसार दोन वर्षापासुन मनरेगाअंतर्गत जिल्हयासाठी सार्वजनिक सिंचन विहिरीचे उद्दिष्ट देण्यात अाले होते त्यातील काही विहिरी अजुनही अपुर्ण होत्या त्यातील जळगाव सपकाळ येथील विहीरीचे अाता दुसर्यांदा अाज सोमवारी शासकीय गायरान जमीनी मध्ये उदघाटन करणार होते माञ तेथे सुध्दा काही शेतकर्यांनी विहीरीच्या कामासाठी अडवणुक केली होती
त्यामुळे अखेर पारध पोलीस स्टेशनचे पि.अाय.अभिजीत मोरे यांना पोलीस बंदोबस्तासह पाचारण करण्यात अाले असल्याने अखेर पोलीस बंदोबस्तात मनरेगा अंतर्गत सार्वजनिक सिंचन विहिरीचे उदघाटन करण्यात अाले अाहे या सिंचन विहिरीसाठी ८ लाख ६४ हजार रुपये अनुदान शासनाकडुन देण्यात येणार अाहे.माञ विहिरीचे काम दर्जेदार होण्याची मागणी ग्रामस्थ करीत अाहेत. यावेळी उदघाटनाला सरपंच कु.विशाखा साळवे,उपसरपंच रुख्मनबाई सपकाळ,ग्रामसेवक महेंद्रकुमार साबळे,ग्रामपंचायत सदस्य अार.ए.सपकाळ.पप्पु सपकाळ,बन्सी वरपे,प्रशांत बुरुकुले,बंकु सपकाळ,सांडु तडवी,पारध पोलीस स्टेशनचे सुरेश पडोळ,चौधरी,यासह ग्रामस्थांची उपस्थीती होती.