भोकरदन तालुका

जळगाव सपकाळ येथील विनय विघालयातील सन २००१ च्या बॅचचा स्नेह मेळावा.


जळगाव सपकाळ,:— भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील विनय विघालयात सन २००१ साली दहावीची परीक्षा उतीर्ण झाल्यानंतर सर्व विघार्थी पुढील शिक्षणासाठी गेले.पुढे शिक्षण पुर्ण करुन अनेकांनी विविध क्षेञांत नावलौकिक मिळवला.तब्बल २० वर्षानंतर या सर्व विघार्थ्यानी त्याच शाळेत पुन्हा एकदा अावडत्या गुरुजनांसोबत शाळा भरवली व नव्या जुन्या अाठवणींना उजाळा दिला.

images (60)
images (60)


या स्नेहमिलन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन.एस.भुतेकर तर प्रमुख पाहुणे पारध पोलीस स्टेशनचे पि.अाय अभिजीत मोरे होते तसेच व्यासपीठावर सेवानिवृत्त शिक्षक डि.टी.देशमुख,व्ही.के.सपकाळ,पी.टी.सपकाळ,बाबुराव सपकाळ,डि.एस.पालकर,राजु चिकटे,सेवानिवृत्त सैनिक काशीनाथ सावळे यांची उपस्थीती होती.यावेळी बोलतांना पि.अाय अभिजीत मोरे म्हणाले की तुम्ही अाज वीस वर्षानंतर एकञ अाला अाहात त्यामुळे जिवनामध्ये वर्गमिञ म्हणुनच राहु नका तर एकमिञ म्हणुन रहा तसेच अापल्या शाळेसाठी माजी विघार्थी यांनी काही हातभार लावुन ग्रथांलय,विज्ञान प्रयोगशाळा यासह इतर मदतीसाठी येणार्‍या काळातील विघार्थ्यासाठी शाळेसाठी अापले काही देणे लागते या भावनेतुन मदतीचे प्रोत्साहन करावे असे बोलतांना म्हणाले तर अाईवडीलानंतर शिक्षकच हा अापला सर्वश्रेष्ठ गुरु असल्याने शिक्षकाचा अादर करा असेही संबोधीत केले.तसेच सेवानिवृत शिक्षक डि.टी.देशमुख म्हणाले की माजी विघार्थी यांनी स्नेहमिलन ठेवल्याने अाम्हाला वीस वर्षानंतर मोठा अानंद झाल्याने भेटलेले विघार्थी नवी ऊर्जा देतात असे सांगितले तर व्ही.के सपकाळ यांनी सुध्दा जुन्या अाठवणीना उजाळा देत विघार्थी व शिक्षक यांच्यातल्या शालेय जिवनावर प्रकाश टाकुन अाठवनी जागवल्या.

तसेच एन.एस.भुतेकर,सि.पी.झाल्टे,अार.बी.जाधव,एस.अार.देवकर यांनी माजी विघार्थी यांचे अाज सुध्दा अाम्हाला तुमच्यामध्ये वीस वर्षाअगोदर जे तुम्ही होते अाता सुध्दा तुमच्यामध्ये विघार्थी असल्याची भावना दिसत अाहे त्यामुळे सर्व विघार्थी यांना शुभेच्छा दिल्या. विघार्थी प्रतिनिधी म्हणुन सतिष बुरुकुले वनविभाग जालना,सिमा कैलास सपकाळ,शिवाजी खरात,नारायण तुपे यांनी शालेय जीवनातील अाठवणीना उजाळा दिला.उपस्थीत सर्व सेवानिवृत्त तसेच शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात अाला तसेच सेवानिवृत्त सैनिक विघार्थी काशीनाथ सावळे यांचा सत्कार व शाळेतील सेवानिवृत्त लिपीक राजु चिकटे यांचा सहपत्नीक सत्कार झाला तसेच दहावी व बारावी वर्गातील गुणवंत विघार्थी यांचा टृाफी देऊन सन्मान करण्यात अाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.एस.सपकाळ यांनी केले तर सुञसंचालन संदिप सपकाळ यांनी तर अाभार एन.एस.भुतेकर यांनी मानले.
यावेळी शाळेचे सर्व कर्मचारी विघार्थी तसेच माजी विघार्थी यांची उपस्थीती होती.


“२००१ च्या बॅचमधील विघार्थी यांनी मेळाव्याचे अायोजन करुन शाळेतील विघार्थी यांच्या वाचनात अावड निर्माण व्हावी यासाठी शाळेच्या ग्रथांलयासाठी ७० विविध पुस्तके भेट म्हणुन दिली तसेच शाळेचा परिसरात वृक्षसंवर्धन व्हावे यासाठी एकवीस वृक्ष लावुन वृक्षसंवर्धनेचा संदेश देऊन झाडे लावा झाडे जगवा यांचा संदेश विघार्थी यांना दिला.


“माजी विघार्थी स्नेहमिलन कार्यक्रमात मराठी पञकारितेचे जनक दर्पण कार आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांच्या जयंती निमित्त पञकार दिन साजरा करण्यात आला यावेळी पञकार गणेश सपकाळ,गणेश राजगुरु,गणेश मुठ्ठे,विनोद सपकाळ,गोकुळ सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!