शासनाच्या योजनांचा लाभ घ्या – जिल्हाप्रमुख अॅड. भास्करराव मगरे
बदनापूर : बदनापूर तालुक्यातील रोषनगाव येथे आज शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जालना जिल्हा शिवसपर्क अभियान घेण्यात आले. यावेळी शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अॅड. भास्करराव मगरे यांनी वंचित घटकांतील नागरिकांच्या समस्या जाणून सरकारी योजनांची माहिती दिली.जालना जिल्हा शिवसंपर्वâ अभियान आज ७ जानेवारी रोजी बदनापूर तालुक्यातील
रोषणगाव येथे घेण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या अनेक समाजहिताच्या
जनकल्याणकारी योजना प्रशासकीय यंत्रणेमार्पâत राबविल्या जातात. परंतु
समाज घटकातील उपेक्षितातील वंचित घटक आज सुध्दा महाराष्ट्र शासनाच्या
योजनांचा लाभ मिळवून देण्याचा या शिवसंपर्वâ सामाजिक अभियानाचा उद्देश
असल्याचे शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अॅड. भास्करराव मगरे यांनी
सांगितले. तसेच हे अभियान जालना जिल्ह्यातील गाव, वाडी, तांडा वस्तीपर्यंत पोहचले आहे. सरकारच्या योजना राबविण्यासाठी जिल्हा, तालुका आणि गावस्तरावर अनेक समित्या कार्यरत आहेत. मनारेगा राज्यापासून तालुकास्तरापर्यंत या मधून ग्रामीण भागातील अल्पभुधारक शेतकरी आणि शेतमजुरांना रोजगार मिळाला पाहिजे. परंतु ते होतांना दिसत नाही. दक्षता समिती शासनाचे अन्नधान्य वितरण व्यवस्थीत गरजु लाभाथ्र्यापर्यंत मिळाले पाहिजे. निराधार समिती मार्फत वयोवृध्द शेतमजुर, विधवा, दिव्यांगसाठी समितीमार्पâत निहाय मेळावे घेवून वंचित लाभाथ्र्यांला लाभ मिळाला पाहिजे.
परंतु तसे होतांना दिसत नाही. महाराष्ट्र शासनाचा महाआवास घरकुल योजना वंचितांना घरकुल मिळत नाही, शासनाचे तरुण बेरोगारांसाठी असलेले आर्थिकविकास महामंडळे बेरोजगार तरुणाला उद्योगासाठी भांडवल निर्माण करुन देतात.मात्र पाहिजे त्या तरुण बेरोजगाराला त्याचा लाभ मिळत नाही, अशा प्रकारे अनेक शासनाच्या योजना राबविल्या जातात. मात्र खरा लाभार्थी या योजनेपासून दुर आहे. त्यामुळे शिवसेना दलित आघाडी शिवसंपर्वâ सामाजिक अभियान राबविण्याची गरज आहे, असेही मगरे यांनी सांगितले. यावेळी अनेक वंचित लाभार्थी उपस्थित होते.