परतूर तालुका

ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ वाटूरात भव्य रास्ता रोको

पक्ष गट तट आणि संघटना बाजूला ठेवून ओबीसी समाज एकवटला,

images (60)
images (60)

आरक्षण नाही तर निवडणूका नाहीची घोषणाबाजी

दिपक हिवाळे/ परतूर न्युज नेटवर्क

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील ओबीसी प्रवर्गातील जात समूहाचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात झाल्याने ओबीसी समाजातुन तीव्र संताप व्यक्त केला जात असून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, सर्व गट तट पक्ष संघटना बाजुला ठेवून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव एकवटल्या चे चित्र यावेळी दिसून आले, आरक्षण नाही तर निवडणूका नाही आशा घोषणाबाजी करत तब्बल दोन तास ठिय्या मांडण्यात आला.


याविषयी अधिक माहिती अशी की,मंगळवार दिनांक 11 रोजी वाटूर फाटा ता परतूर येथे नांदेड जालना महामार्गावर सदरील आंदोलन करण्यात आले,राज्यातील ओबीसी समाज राजकीय अरक्षणापासून वंचित झाला असून झालेल्या अनेक निवडणूका अरक्षणाविना घेण्यात आल्याने ओबीसी समाजात तीव्र संताप व्यक्त यावेळी दिसून आला, सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवलेले आरक्षण पुन्हा मिळावे याकरिता ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी गावागावातून हजारो ओबीसी बांधव उपस्थित झाले होते,ओबीसी समाजातील विविध घटकातील लोक आपल्या वेशभूषा परिधान करून या आंदोलनात सहभागी झाले होते,या आंदोलनात परतूर तालुक्यातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,आंदोलनासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर फौज फाटा तैनात करण्यात आला होता,रास्ता रोको आंदोलन यशस्वी करण्यासाठी विविध पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या,ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती परतूर या बॅनर खाली हे आंदोलन पार पडले

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!