जालना जिल्हा

लसीकरणाच्या कामात हलगर्जी; 17 वैद्यकीय अधिकाऱ्यांना  नोटिसा

न्युज | जालना

images (60)
images (60)


सध्या देशभरात लसीकरणाची गती वाढवण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने परिश्रम घेतले जात आहेत. त्यातच काही ठिकाणी आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी कामात कुचराई करत असल्याचं समोर येत आहे. जालना जिल्ह्यातील तीन तालुका आरोग्य अधिकारी आणि पंधरा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील कामात कुचराई केल्याचं समोर आलय.

मंठा अंबड, घनसावंगी तालुका अधिकारी; तर गोंदी, शहागड, सुखापुरी, वाकुळणी, सोमठाणा, राजूर, राजा टाकळी, डोंणगाव खासगाव, वरुड, रामनगर, तळणी, ढोकसाळ, पाटोदाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे


या 17 वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली . यामध्ये अंबड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कांगणे, घनसांगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड आणि मंठा तालुका वैद्यकीय अधिकारी मुकेश मोटे यांचा समावेश आहे. तर इतर 15 वैद्यकीय अधिकार्‍यांचा देखील यामध्ये समावेश आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!