भोकरदन तालुका

बारा रुपयाचा जीवन विमात मिळाला दोन लाखांचा लाभ

प्रतिनिधी जळगाव सपकाळ

images (60)
images (60)

महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अनवा च्या वतीने जळगाव सपकाळ येथील मयत सतीश रामराव सपकाळ यांच्या वारस पत्नीस दोन लाख रुपयांचा धनादेश बँक व्यवस्थापक जीवन बैनाडे यांच्या हस्ते देण्यात आला.


जळगाव सपकाळ येथील सतीश रामराव सपकाळ यांचा अपघाती मृत्यू झाला ,त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत सुरु असलेला जीवन सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा या योजनेअंतर्गत 12 रुपये आणि 330 रुपयाचा प्रीमियम भरून विमा उतरला होता त्या पोटी दोन लाख रुपये चा धनादेश त्यांच्या पत्नीस सुपूर्त करण्यात आला आणि अजून एक महिन्याभरात दोन लाख रुपयांचा धनादेश देणार असल्याचे बँक व्यवस्थापक जीवन बैनाडे यांनी सांगितले .


आपल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत येऊन प्रत्येकाने बारा रुपये आणि 330 रुपये प्रमाणे प्रीमियम असणारा विमा भरावा आयुष्याच काही सांगता येत नाही मृत्यू हा केव्हाही येऊ शकतो .अपघात होतात त्यामुळे आपल्या वारसास अत्यल्प प्रीमियम मध्ये दोन लाख रुपयांचा विमा ची सेवा सुरू करण्यात आली आहे ,तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा .वय वर्ष अठरा ते पन्नास पर्यंत बारा रुपयाचा विमा उतरवता येतो ज्यामध्ये फक्त अपघातात मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये ची मदत मिळते आणि 330 रुपयांमध्ये वय वर्षे 70 पर्यंत विमा उतरवता येतो त्यामध्ये दोन लाख रुपयाचा वारसास मिळतात .वय वर्षे 50 पर्यंत 12 रुपये आणि 330 रुपये असे दोन्ही विमा आपल्याला घेता येतो. प्रत्येकाने या विमा योजनेचा लाभ घ्यावा यासाठी बँक सर्वतोपरी सहकार्य आणि प्रयत्न करत आहे . आपण मोबाईलवर दररोज वेगवेगळे स्टेटस ठेवतो त्यातच प्रत्येकाने बारा रुपये आणि 330 रुपयांचा विमा उतरून घ्यावा असे स्टेटस कमीत कमी दर आठवड्यातून एकदा ठेवावे जेणेकरून आपल्या संपर्कातील व्यक्ती या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेतील असेही यावेळी जीवन बैनाडे यांनी सांगितले.


यावेळी रमेश शेठ सपकाळ ,केतन साळवे ,गणेश सोनोने, ,डॉक्टर शालिकराम सपकाळ, पप्पू सपकाळ, रवींद्र सपकाळ ,रामराव सपकाळ ,प्रशांत बुरकुले, बन्सी वर्पे ,विष्णू पालोदे ,विष्णु सपकाळ, गणेश राजगुरू, संदीप कायस्थ ,मीरा सपकाळ, शारदा सपकाळ, प्रतिभ बेलोकर, नंदा सपकाळ आदींची उपस्थिती होती

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!