बदनापूर तालुका
बाभुळगावमधे दारूबंदीचा ठराव मंजूर ;देखरेख समिती स्थापन
जालना | प्रतिनिधी
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या अनुषंगाने व जिल्हाधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांच्या निर्देशानुसार बाभुळगावमधे दारूबंदीसाठी सरपंच मेघा राहुल गाढे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
सुरूवातीलाच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी गावातील बहुसंख्य महिला हजर होत्या.युवा कार्यकर्ते विशाल गाढे यांनी दारूबंदी संदर्भात प्रास्ताविक मांडले.त्यानंतर ग्रा.प सदस्य सरला गाढे यांनी दारूबंदीचा ठराव मांडला. त्याला मिराबाई राऊत यांनी अनुमोदन दिले तसेच हा ठराव सर्वानुमते हात वर करून मंजूर करण्यात आला.यावेळी 15 महिलांची चांगुणाबाई राऊत यांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदी देखरेख समिती नेमण्यात आली तसेच 15 मुलांचे ग्रामसुरक्षा दल अंकुश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आले आहे.