युगंधर प्रतिष्ठानच्या माध्यमातून 32 हजार रुपयांची मदत
जाफराबाद प्रतिनिधी
अकोलादेव ता. जाफराबाद येथील कॅन्सरग्रस्त युवकाला युगंधर प्रतिष्ठानच्या माध्यमातून 32 हजार रुपयांची मदत देण्यात आली. अकोलादेव येथील बाबासाहेब छडीदार या युवकाला कॅन्सर झाला असून बाबासाहेब च्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची आहे. तो एका मोबाईल शॉपीवर काम करतो.
औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन युगंधर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले होते.गरजू, वंचित आणि दुर्धर आजारग्रस्तांच्या मदतीसाठी कायम अग्रणी असणाऱ्या युगंधर च्या आवाहनातुन संकलीत झालेली 31 हजार 850 रुपये मदत बाबासाहेबच्या कुटुंबीयांकडे आज सुपूर्द करण्यात आली.यावेळी नवभारत शिक्षण संस्थेचे संचालक मधुकर निकम, युगंधर प्रतिष्ठाण चे अध्यक्ष विनोद कळंबे, उपाध्यक्ष अल्ताफ शेख, सचिव धनंजय मुळे, किशोर मुळे आदी उपस्थित होते.