बदनापूर तालुका

नार्कोटेक्स डिपार्टमेंटचे अधिकारी असल्याचे सांगून ट्रकचालकाला बदनापुरात लुटले !

बदनापूर प्रतिनिधी

images (60)
images (60)

बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रासमोर जालना- औरंगाबाद महामार्गावर केरळ येथील ट्रकचालकाला गाडी अडवून आम्ही नार्कोटेक्स खात्याचे अधिकारी कर्मचारी आहे , ट्रकची झडती घ्यावयाची आहे असे म्हणत गाडीमध्ये असलेली जवळपास 50 हजार रुपयाची रोख रक्कम घेऊन लुटण्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे .

दि . 17 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास लक्ष्मणन चामकुटटन केसी ( वय 48 , रा . कोझीचुंडील वेडू , कनियारकोट , जि . त्रिसुर , केरळ ) हे आपली ट्रक ( क्रमांक एमएच 04 एफयू 5639 ) घेऊन जात असताना 30 ते 35 वयोगटातील अनोळखी चार तरुण दोन मोटारसायकलवरून येऊन लक्ष्मणन यांची ट्रक थांबवण्यास भाग पाडले व आम्ही नाकोटेक्स डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी आहोत असे म्हणत ओळखपत्र दाखवून त्यांची फसवणूक केली व तुमचे वाहन तपासणी करावयाचे आहे असे म्हणत ट्रक तपासणीच्या बहाण्याने ट्रकमध्ये ठेवलेले 48600 रुपयांची रोकड घेऊन पळ काढला .

औरंगाबाद – जालना महामार्गावर मोठी वाहतूक असते अशा या महामार्गावर सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने वाहनाचालकांत मोठी घबराट निर्माण झालेली आहे . दरम्यान लक्ष्मणन यांनी बदनापूर पोलिस ठाण्यात या बाबत तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून अनोळखी 4 इसमांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेळके हे करत असल्याची माहिती पोलिस अंमलदार श्रीमती सूर्यवंशी यांनी दिली आहे .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!